Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

 

कार्यकारिणीकडून 26 फेब्रुवारी रोजी होणार शिक्कामोर्तब

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आमदारांकडून एकमताने निवड करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली असून या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सर्व उपस्थित त्यांनी हात वर करून या प्रस्तावाला एकमुखाने पाठिंबा दिला.

या बैठकीत काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाचा विषय उपस्थित केला. मात्र, हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर या बैठकीत चर्चा होणार नाही, असे सांगत वरिष्ठ नेत्यांकडून या विषयावर पडदा टाकण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading