अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन
शोकाकुल वातावरणात नागरिकांनी दिला अखेरचा निरोप
छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री आणि मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या पत्नी व सिल्लोडच्या माजी नगराध्यक्ष नफीसा बेगम यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पतीसह मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
केवळ सत्तार यांच्या पत्नी एवढीच नफीसा बेगम यांची ओळख नव्हती. मागील काही काळापासून त्या सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात सक्रिय होत्या. आपल्या समाजाभिमुख कार्यपद्धतीने त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
सिल्लोड च्या नगराध्यक्ष मणून जनतेच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. तसेच शहरातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्या आणि चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी नागरी सुविधा आणि विकास कामांवर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यांच्या निधनाने केवळ सिल्लोडच नव्हे तर संभाजीनगर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.
