Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

भाजप आणि काँग्रेसच्या दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

 

काँग्रेस भवनासमोरील राड्यासंदर्भात पोलिसांची कठोर भूमिका

पुणे प्रतिनिधी

काँग्रेस भवन समोर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने काँग्रेस भवन वर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची माहिती मिळतात काँग्रेसचे कार्यकर्ते ही काँग्रेस भवनात जमा झाले.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येताच सुरुवातीला घोषणायुद्ध आणि बाचाबाची झाली. त्यानंतर अचानक दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. या प्रकारात काही कार्यकर्ते जखमी झाले. तसेच काँग्रेस भवन जवळ पार्क केलेल्या अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading