Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

व्यक्तव्याचा विपर्यास करणे हा भारतीय जनता पक्षाचा खोडसाळापणा – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई प्रतिनिधी

शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला आणि त्याचा आदर्श हा टिपू सुलताननि घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या समकक्षतेच्या अनुषंगाने माझे वक्तव्य केलेले आहे. त्याचा विपर्यास करणे हा भारतीय जनता पक्षाचा खोडसाळापणा आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केली.

प्रत्येक बाबतीत जात आणि प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंडा आहे आणि या फंड्याच्या अनुषंगाने या माझ्या केलेल्या एका जबाबदार वक्तव्याचा वापर ते हिंदू मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालण्यासाठी करत आहेत. त्याबद्दल मी माफी मागावी अशी माफीवीरांच्या पक्षाची भूमिका आहे असेही सपकाळ म्हणाले.

महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने सर्रास टिपू सुलतानच्या छायाचित्रांचा वापर केल्याचा आरोप करून सपकाळ म्हणाले की, तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण आपली भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्ताने उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे.

या वक्तव्याबाबत माझे पुतळे जाळण्याचे काम भाजप करणार असल्याची माहिती मिळत आहे. माझे पुतळे जाळण्याआधी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत विधान करणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांचे पुतळे जाळावे, असेही सपकाळ म्हणाले.

अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलमीनचे मतदान घेतले. चंद्रपूरमध्येही एमआयएमच्या मदतीने महापौर बसविला. महाराष्ट्रभर 21 ठिकाणी ठिकाणी एमआयएम सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता. युती करता. मदत करता. आपलं त्यांच्याशी साटेलोटे आहे हे लपून राहिलेलं नाही, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading