Wednesday, April 8, 2026
Latest NewsPUNE

बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी

 

तळेगाव दाभाडे : बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने संत गुरु सेवालाल महाराजांची जयंती पागडी रथयात्रा, भोग, प्रतिमा पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतही संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, नगरपरिषद, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक ते सुशीला मंगल कार्यालया दरम्यान भव्य पागडी रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत मावळ तालुक्यातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आयोजित बंजारा समाज मेळाव्याचे उदघाट्न निवृत्त जिल्हा न्यायाधीश नामदेव चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुधाकर शेळके होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष संतोष दाभाडे उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल खळदे, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा रत्नू जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ममता चव्हाण – राठोड, सामाजिक कार्यकर्ते नितीन मुऱ्हे, ग्रामविकास अधिकारी परमेश्वर राठोड, वन अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. बी एस पवार, शंकर खेतावत, शोभा राठोड, विजयालक्ष्मी राठोड, जयश्री खेतावत, मीराबाई राठोड, लक्ष्मण नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष चंदू राठोड, उपाध्यक्ष देसू राठोड, जयराम चव्हाण, शंकर पवार, खजिनदार राजू पवार, सचिव अतुल चव्हाण, विठ्ठल जाधव, विठ्ठल राठोड, यंका राठोड, शेट्टी चव्हाण, राम जाधवआदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोष दाभाडे म्हणाले, की बंजारा समाज हा मेहनत करून जीवन जगणारा समाज आहे. मावळच्या जडणघडणीत या समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाला न्याय मिळावा. संस्कृती जपण्याचे काम या समाजाने केले. समाजाला जी मदत लागेल ती करू.

सुधाकर शेळके म्हणाले, की अनेकजण उच्चशिक्षित असून, मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्याला कायम प्राधान्य असणार आहे.

नामदेव चव्हाण म्हणाले, की आपल्या समाजाची प्रगती व्हावी, म्हणून आपण सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. संत सेवालाल महाराजांच्या विचारातून प्रेरणा घ्यायला हवी. शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या.
हिरा जाधव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी. सूत्रसंचालन महादेव राठोड यांनी, तर आभार लखन जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading