‘सीएसआर विंटर करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे ११ फेब्रुवारीपासून आयोजन !!
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना ट्वेन्टीफोर स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि क्रिकस्टार रायझिंग (सीएसआर) ॲकॅडमीचे संचालक उदय म्हात्रे म्हणाले की, १४ वर्षाखालील गटातील मुलांना स्पर्धात्मक सामन्यांचा अनुभव मिळावा यासाठी या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १० क्रिकेट क्लब आणि ॲकॅडमी यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. ४५-४५ षटकांचे सामने खेळताना युवा खेळाडूंचा खरा कस लागेल आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
यजमान सीएसआर स्पोर्ट्स ॲकॅडमी, ईजे स्पोर्ट्स ॲकॅडमी, साई एमजे क्रिकेट ॲकॅडमी, छत्रपती क्रिकेट क्लब, व्हिडीआर क्रिकेट ॲकॅडमी, पुणे क्रिकेट ॲकॅडमी, योगेश इलेव्हन क्रिकेट ॲकॅडमी, फायटर्स ११ क्लब, स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक आणि पीटीसीए क्रिकेट ॲकॅडमी हे १० संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक आणि मेडल्स् मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना ईजे स्पोर्ट्स ॲकॅडमी आणि साई एमजे क्रिकेट ॲकॅडमी यांच्यामध्ये होणार आहे.
