Monday, September 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘अजितदादांची इच्छा पूर्ण करण्याचा पवार परिवाराचा प्रयत्न’ -रोहित पवार

 

बारामती प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हा परिषदेत त्यांचे अधिकाधिक कार्यकर्ते निवडून यावे, अशी इच्छा होती. तसेच पवार परिवाराने एकत्र यावे, ही देखील त्यांची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या हयातीत पुढाकार घेतला आणि आता आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.

बारामती तालुक्यातील पिंपळी गावात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

पवार परिवाराने एकत्र यावे या दृष्टीने अजितदादांचे प्रयत्न अखेरपर्यंत सुरू होते. त्यामुळे तीच त्यांची अखेरची इच्छा असल्याचे समजून आम्ही ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

सध्या पवार कुटुंबीयांमध्ये सलग तीन दिवस सुरू असलेल्या चर्चा भावनिक स्वरूपाच्या आहेत. त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नाही, असे देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केले. आजही काही न ठरवता पवार परिवार एकत्र जमल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अजितदादांनाच बघत आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाप्रमाणेच त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवार यांनाच मिळावे, ही अपेक्षा रोहित पवार यांनी पुन्हा व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading