भूखंड घोटाळा प्रकरणात खडसे यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट
मुंबई प्रतिनिधी
भोसरी येथील जमीन भूखंड घोटाळ्यात सुनावणीला हजर न राहिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. याच प्रकरणात अटकेत असलेल्या त्यांच्या जावयाचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला आहे.
भोसरी येथील भूखंड घोटाळ्यात आपल्याला दुशमुक्त करावे असा अर्ज खडसे यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, विशेष पीएमएलए न्यायालयाने तो फेटाळला आहे या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक वेळा समन्स बजावूनही सुनावणीच्या तारखांना उपस्थित न राहिल्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी दिनांक 24 रोजी पार पडणार आहे. या प्रकरणामुळे खडसे कुटुंबीयांच्या समोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे.
