उत्तर प्रदेशने दूधवा राष्ट्रीय उद्यानात इको-टुरिझम हब विकसित करण्यासाठी बीव्हीजी इंडिया सोबत भागीदारी
उत्तर प्रदेश मधील दूधवा राष्ट्रीय उद्यान येथे एक नवीन इको-टुरिझम डेस्टिनेशन आकाराला आले आहे. पर्यटन पायाभूत सुविधा लखीमपूर खीरी जिल्हा मधील चंदन चौकी येथे बीव्हीजी इंडिया आणि उत्तर प्रदेश इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या भागीदारीत विकसित आणि देखभाल केल्या जात आहेत.
या उपक्रमाचा भाग म्हणून बीव्हीजी इंडिया ‘बीव्हीजी इंडिया रिसॉर्ट’ विकसित करत आहे, जो मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याचे नियोजित आहे. सुमारे 5 एकर क्षेत्रावर पसरलेला हा पर्यावरणपूरक रिसॉर्ट चंदन चौकी इको-टुरिझम प्रकल्पाचा केंद्रबिंदू असून, वेलनेस आणि स्थानिक संस्कृतीवर आधारित निसर्गकेंद्रित पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जात आहे.
पर्यावरणावर कमी परिणाम होईल आणि पर्यावरणपूरक डिझाइनला प्राधान्य देत विकसित केलेले ‘बीव्हीजी इंडिया रेसॉर्ट’ जंगल परिसराशी सुसंगत राहील अशा पद्धतीने उभारले आहे. त्याचबरोबर येथे आधुनिक हॉस्पिटॅलिटी सुविधा उपलब्ध आहेत. रिसॉर्टमध्ये विविध प्रकारचे निवास पर्याय, मनोरंजन सुविधा, फूड अँड बेव्हरेज सेवा तसेच लहान कॉन्फरन्स आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे हे ठिकाण पर्यटनासाठी येणारे पर्यटक, वन्यजीव प्रेमी, कुटुंबे तसेच कॉर्पोरेट गटांसाठी उपयुक्त ठरत आहे.
या भागीदारीअंतर्गत बीव्हीजी इंडिया ही इको-टुरिझम डेस्टिनेशन विकसित करणे आणि चालवणे यासाठी जबाबदार आहे. यामध्ये पर्यटक सुविधांचे व्यवस्थापन, देखभाल, दैनंदिन कामकाजावर देखरेख तसेच पर्यावरणीय आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सुरक्षितता सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि प्रदेशाचा पर्यावरणीय समतोल जपणे हा आहे.
या विकासाबाबत प्रतिक्रिया देताना हिम्मतराव गायकवाड, चेअरमन, बीव्हीजी इंडिया म्हणाले, “बीव्हीजी इंडिया रेसॉर्ट हा पर्यटनाने निसर्गाचा सन्मान केला पाहिजे आणि स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण केल्या पाहिजेत या आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. दूधवा येथे या प्रकल्पाद्वारे आम्ही असे डेस्टिनेशन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, जे पर्यटकांना या प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धी अनुभवण्याची संधी देईल आणि त्याच वेळी त्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपेल. उत्तर प्रदेशात जबाबदार आणि शाश्वत पर्यटनासाठी ही आमची दीर्घकालीन बांधिलकी आहे.”
या विकासामध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. डेस्टिनेशनमध्ये थारू आदिवासी हस्तकलेसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे, ज्यामुळे स्थानिक कारागीर — विशेषतः महिलांना — पारंपरिक कौशल्य सादर करण्याची आणि पर्यटनातून थेट आर्थिक लाभ मिळवण्याची संधी मिळते. तसेच रिसॉर्टमधील सेंद्रिय बागायती क्षेत्रांमुळे पर्यटकांना ग्रामीण जीवनशैली आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळते.
दूधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश मधील तराई पट्ट्यात, भारत-नेपाळ सीमेवर वसलेले असून जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. भारतातील मोजक्या संरक्षित क्षेत्रांपैकी हे एक असून येथे बंगाल वाघ आणि एकशिंगी गेंडे नैसर्गिक अधिवासात एकत्र आढळतात. याशिवाय येथे संकटग्रस्त दलदली हरिण (स्वॅम्प डिअर) तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींचे समृद्ध अस्तित्व आहे. हे उद्यान प्रोजेक्ट टायगरचा भाग असल्यामुळे वन्यजीव संवर्धन आणि इको-टुरिझमसाठी हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
चंदन चौकी येथे बीव्हीजी इंडिया रेसॉर्ट विकसित झाल्यामुळे उत्तर प्रदेश राज्य आपली इको-टुरिझम क्षमता अधिक मजबूत करत आहे. संवेदनशील नैसर्गिक परिसरात संवर्धन, स्थानिक समुदायाचा सहभाग आणि दर्जेदार पर्यटन पायाभूत सुविधा यांचा समन्वय कसा साधता येतो, याचे हे एक प्रभावी उदाहरण ठरत आहे.
