पुरस्कार विजेता अॅनिमेटेड चित्रपट महावतार नरसिंहचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
भारतातील एक आघाडीची हिंदी चित्रपट वाहिनी आणि ब्लॉकबस्टर कार्यक्रमांचे पॉवरहाऊस असलेल्या सोनी मॅक्स वाहिनीने या श्रेणीतील आपले नेतृत्व बळकट केले आहे. गाजलेले चित्रपट आणि सांस्कृतिक भावना असलेल्या कथा सादर करण्याचा वारसा चालवत ही वाहिनी आता ‘महावतार नरसिंह’ हा वाखाणलेला अॅनिमेटेड चित्रपट सादर करणार आहे. शनिवार, 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता हा चित्रपट पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर सादर होणार आहे.
या वर्षातील सर्वात लोकप्रिय ठरलेला अॅनिमेटेड चित्रपट आणि ‘बेस्ट अॅनिमेटेड मूव्ही ऑफ द यर’ पुरस्कार जिंकणारा हा चित्रपट आता टेलिव्हिजनच्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाच्या रूपात सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एक नेत्रसुखद आणि भावनांना स्पर्श करणारा अनुभव देण्याचे वचन सोनी मॅक्स देत आहे.
दिग्दर्शक आश्विन कुमार म्हणाले, “महावतार नरसिंह सारख्या अॅनिमेटेड चित्रपटासाठी, त्यातील व्यक्तिरेखा जिवंत करण्यात व्हॉईस कलाकारांचा सिंहाचा वाटा असतो. आम्ही अत्यंत विचारपूर्वक डबिंग आर्टिस्ट्सची निवड केली. कारण, त्यांच्या आवाजातून या कथेला अपेक्षित असलेल्या भावना, तीव्रता आणि आध्यात्मिक सखोलता व्यक्त होणे गरजेचे होते. या चित्रपटाला मिळालेले उदंड प्रेम पाहताना हे लक्षात येते की त्यांचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना किती भावला आहे. मी खरोखर रोमांचित आहे कारण आता मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक हा अनुभव घेऊ शकतील. सोनी मॅक्स वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या रूपात ‘महावतार नरसिंह’ची दमदार कहाणी देशातील घराघरापर्यंत घेऊन जात आहे.”
भारतीय पुराणकथा आणि आध्यात्मिक लोककथेत रुजलेला ‘महावतार नरसिंह’ चित्रपट महाकाव्यात्मक पौराणिक अॅनिमेशन प्रकारात मोडतो. हा जॉनर पुराण कथांची अत्याधुनिक अॅनिमेशनसोबत सांगड घालतो. या चित्रपटात ताकद, विश्वास आणि न्यायाचे मूर्तिमंत रूप असलेल्या भगवान नरसिंहाची अद्भुत कहाणी अत्यंत सुंदर अॅनिमेशनच्या आणि भावपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून सांगितली आहे. लहान मुले, कुटुंबं आणि पौराणिक कथांचे चाहते अशा सर्वांना आवडेल अशाप्रकारे तयार केलेला हा चित्रपट त्यातील भव्यता, सखोलता आणि चांगल्याच्या वाईटावर विजयाच्या संदेशामुळे उठून दिसतो.
प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून वाहवा मिळवणारा ‘महावतार नरसिंह’ आता टेलिव्हिजनवरील प्रवासाची सुरुवात करत आहे आणि अर्थपूर्ण, मनोरंजक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संबद्ध चित्रपट भारतीय घराघरात पोहोचवण्याची सोनी मॅक्सची वचनबद्धता मजबूत करत आहे.
‘महावतार नरसिंह’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघा शनिवार, 24 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता फक्त सोनी मॅक्सवर
