Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

पराक्रमाने धगधगणाऱ्या शनिवार वाड्याचा वाढदिवस साजरा

 

‘हर हर महादेव’च्या जयघोषात उघडला दिल्ली दरवाजा
पुणे : ‘हर हर महादेव’ अशी घोषणा देत मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. फुलांची सजावट, वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी आणि थोरले बाजीराव पेशवे तसेच नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करीत शनिवार वाड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा २९४ वा वर्धापन दिनानिमित्त थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याचा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, नगरसेवक कुणाल टिळक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, सूर्यकांत पाठक, अशोक गुंदेचा, सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, मकरंद माणकीकर, आशुतोष नगरकर, उमेश देशमुख, सचिन बोधनी, विश्वनाथ भालेराव आदी उपस्थित होते.

 आमदार हेमंत रासने म्हणाले, ज्या छत्रपती शिवरायांना स्मरून थोरले बाजीराव पेशवे यांनी अटकेपार झेंडा नेला, तो इतिहास जाज्वल्य आहे. पराक्रमाची साक्ष देणारा शनिवार वाडा पुन्हा पूर्वीप्रमाणे सात माडी शनिवार वाडा व्हावा आणि त्याला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असून शनिवार वाड्याच्या तीनशेव्या वर्धापन दिनापर्यंत ते साध्य होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 कुंदनकुमार साठे म्हणाले, पुण्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या नानासाहेब पेशवे यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्वारगेट मेट्रो स्टेशनला नानासाहेब पेशवे यांचे नाव देऊन त्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपणारे भव्य स्मारक उभारावे. यानिमित्ताने पुण्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण नागरिकांना होईल.
 एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading