Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन ६ : अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा संयम सुटला; घर सोडण्याचा दिला इशारा!

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि ‘चिल’ राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अनुश्री माने हिचं वागणं. घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्याने तिला कडक शब्दात सुनावले. या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालं आहे.

राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील संवाद:
घरातील वातावरणात तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे म्हणाली, “मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही.” तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले, “जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू.” अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला, “हे बोलणं चुकीचं आहे. Do not dare to say that again. आयुष्यात मी २५ वर्षं एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?” या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिडून ओरडला, “मला या घरात आता थांबायचं नाहीये!” आणि तो तिथून निघून गेला.

आता हा वाद निवळणार की राकेश खरोखरच घर सोडणार? हे पाहण्यासाठी पहा ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ – दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि कधीही JioHotstar वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading