Thursday, May 14, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन ६ : बिग बॉसच्या घरात दार उघडणार नशिब उल्टा-पुल्टा होणार !

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा दंगा, कल्ला आणि बॉण्डिंग पाहायला मिळत आहेत. घरात दररोज नवनवीन धक्के आणि जबरदस्त ट्विस्ट रंगात रंगत आहेत. खेळाचा प्रत्येक टप्पा सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरत असतानाच, आता घरात एका अशा गोष्टीची एन्ट्री होणार आहे ज्यामुळे संपूर्ण गेमच बदलून जाणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळेल. घरामध्ये आता ‘उल्टा-पुल्टा’ रूमचं दार उघडणार आहे. या रूममध्ये अशी ताकद आहे की ती संपूर्ण खेळाचा नूर पालटून टाकू शकते. ‘या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल’ असं म्हणत बिग बॉसने सदस्यांना इशाराच दिला आहे. बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले, ” या रूममध्ये ताकद आहे अख्खा गेम उल्टा-पुल्टा करून टाकण्याची.”

या नवीन रूममुळे कोणाचे कोणाशी असलेले समीकरण बदलणार? कोणाचं नशीब चमकणार आणि कोणाच्या अडचणी वाढणार? हे पाहणे रंजक ठरेल. ज्यामुळे घरातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतेय.

नक्की काय आहे हे ‘उल्टा-पुल्टा’ प्रकरण? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी सिझन ६, दररोज रात्री ८:०० वा. फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading