Sunday, July 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

वचन दिले तू मला मालिकेत धमाकेदार ट्विस्ट!

स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. ज्या पद्माच्या न्यायासाठी या कहाणीची सुरुवात झाली, तीच पद्मा आता हर्षवर्धनच्या दबावाखाली येऊन विक्रांतसोबत लग्न करण्यास तयार झाली आहे. मात्र पद्माचं लग्न रोखण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी शौर्य आणि ऊर्जा कोणतीही कसर सोडणार नाही आहेत. याचसाठी शौर्य आणि ऊर्जा एक भन्नाट प्लॅन आखणार आहेत. या मिशनसाठी दोघंही वेषांतर करून थेट लग्नमंडपात पोहोचणार आहेत. पत्रकार आणि कॅमेरामनच्या रुपात त्यांची एण्ट्री होणार असून त्यांचा हा अनोखा लूक लक्षवेधी ठरणार आहे.

शौर्य आणि ऊर्जाची भूमिका साकारणारे अभिनेता इंद्रनील कामत आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे हा नवा लूक साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. या वेषांतरासाठी ‘वचन दिले तू मला’ मालिकेच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली आहे. मेकअप आर्टिस्ट सिद्धेश परब आणि सुनील पवार यांनी लूकवर इतकं बारकाईने काम केलं की, सेटवर तयार होऊन आल्यानंतर कलाकारांना अनेकांनी पहिल्याच नजरेत ओळखलंच नाही. प्रेक्षकांना हा लूक नक्की आवडेल याची खात्री आहे अशी भावना इंद्रनील आणि अनुष्काने व्यक्त केली.

शौर्य आणि ऊर्जाचा हा धाडसी डाव यशस्वी होणार का? पद्माचं लग्न थांबणार का? हर्षवर्धनच्या कारस्थानांचा पर्दाफाश होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी वचन दिले तू मला न चुकता पाहा सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading