Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या 

अकोला प्रतिनिधी :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या चाकूहल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना आज पहाटे हिदायत पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सायंकाळी हिदायत पटेल हे त्यांच्या मूळगावी मोहाळा येथील मरकझ मशिदीतून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या पोटात आणि मानेवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली आणि उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांचे निधन झाले.
हिदायत पटेल हे 73 वर्षांचे होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने 2014 आणि 2019 च्या अकोला लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह स्थानिक राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी काही तासांतच अटक केली असून हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading