Wednesday, June 3, 2026

Day: November 9, 2025

BusinessLatest News

एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) खुली होणार ११ नोव्हेंबर रोजी

पुणे: एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या मंगळवारी, दि. ११ नोव्हेंबर सुरू होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओमधील बोली प्रक्रिया एक कामकाजाच्या दिवस आधी, म्हणजे सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होईल. बोली प्रक्रिया बंद होण्याची तारीख गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५ आहे. या आयपीओसाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा २०६ ते २१७ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान ६९ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ६९च्या पटीत बोली लावता येईल. आयपीओच्या या प्रस्तावामध्ये एकूण २१,४३८.६२ दशलक्ष (२,१४३.८६ कोटी) रुपयांच्या नवीन इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे, तसेच मंजुनाथा डोंथी वेंकटारथ्नैया आणि शुभा मंजुनाथा डोंथी (प्रवर्तक विक्री भागधारक) या विद्यमान भागधारकांकडील ७,५६१.३८ दशलक्ष (७५६.१४ कोटी) रुपयांच्या समभागांची विक्री (ऑफर फॉर सेल) केली जाणार आहे. एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर ही कंपनी मुख्यतः सौर मॉड्यूलची उत्पादक आहे. क्रिसिलच्या अहवालाप्रमाणे, ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या उत्पादन क्षमतेनुसार, एकात्मिक सौर फोटोव्होल्टाइक (पीव्ही) मॉड्यूल आणि सौर सेल यांचे उत्पादन करणारी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे, तसेच देशातील अग्रगण्य सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी ती एक आहे. ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीकडे ७.८० गिगावॅट्स इतकी सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या उत्पादनाची क्षमता आणि २.९४ गिगावॅट्स इतकी सौर सेलच्या उत्पादनाची क्षमता आहे. या क्षेत्रात कंपनीला १८ वर्षांहून अधिक कामकाजाचा अनुभव आहे. तसेच, ही कंपनी भारतातील उच्च कार्यक्षम “टनेल ऑक्साइड पॅसिव्हेटेड कॉन्टॅक्ट” (टीओपीकॉन) तंत्रज्ञानाचा अवलंब करून सौर सेल निर्मिती सुरू करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे. मार्च २०२५ पर्यंत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मोजक्या भारतीय सौर सेल उत्पादकांमध्ये ही कंपनी गणली जाते (स्त्रोत: क्रिसिल अहवाल). ही प्राधमिक समभाग विक्री प्रक्रिया सेबीच्या आयसीडीआर नियमनातील कलम ६(२) नुसार बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे केली जात आहे. या नियमानुसार आणि कलम ३२(१) च्या तरतुदीनुसार, एकूण प्रस्तावित समभागांपैकी किमान ७५ टक्के भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी क्यूआयबी प्रमाणानुसार वाटपासाठी राखीव असेल. कंपनीला आपल्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) यांच्या सल्ल्यानुसार, या क्यूआयबी भागातील कमाल ६० टक्के हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीप्रमाणे वाटप करण्याचा अधिकार आहे. या अँकर गुंतवणूकदार भागामधील किमान एकतृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल, त्याकरीता अशा फंडांकडून अँकर गुंतवणूकदार वाटप किंमतीइतकी किंवा त्याहून जास्त किंमतीची बोली यावी लागेल. जर अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव भागात पूर्ण मागणी नसेल किंवा काही समभागांचे वाटप झाले नसेल, तर उरलेले समभाग नेट क्यूआयबी भागामध्ये समाविष्ट केले जातील. तसेच, नेट क्यूआयबी भागातील ५ टक्के हिस्सा केवळ म्युच्युअल फंडांसाठी प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. उर्वरित नेट क्यूआयबीचा हिस्सा सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (अॅकर गुंतवणूकदार वगळता), त्यामध्ये म्युच्युअल फंडांचा समावेश करून, प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. याकरीता त्यांनी प्रस्तावित किमतीइतकी किंवा त्याहून अधिक किंमतीची बोली लावायला हवी. जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी नेट क्यूआयबी भागाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्या न वापरलेल्या समभागांचा शिल्लक भाग उर्वरित क्यूआयबी भागात समाविष्ट करून सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रमाणानुसार वाटप केला जाईल. याव्यतिरिक्त, एकूण प्रस्तावित समभागांपैकी कमाल १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयबी) उपलब्ध असेल. या एनआयबी भागातील (अ) एकतृतीयांश हिस्सा ०.२० लाखांपेक्षा जास्त आणि १.०० लाखांपर्यंत अर्ज आकार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल; आणि (ब) दोनतृतीयांश हिस्सा ₹१.०० लाखांपेक्षा जास्त अर्ज आकार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. या दोन्ही उपविभागांपैकी कोणत्याही विभागात मागणी कमी राहिल्यास, न वापरलेले समभाग सेबीच्या आयसीडीआर नियमानुसार दुसऱ्या उपविभागातील गुंतवणूकदारांना वाटप केले जाऊ शकतात. तसेच, एकूण प्रस्तावातील कमाल १० टक्के हिस्सा रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. त्याकरीता त्यांनी प्रस्तावित किमतीइतकी किंवा त्याहून जास्त किंमतीची वैध बोली केलेली असावी. अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व अर्जदारांना त्यांच्या एएसबीए (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) खात्याचे तपशील देऊन ही प्रक्रिया अनिवार्यपणे वापरणे आवश्यक आहे. यूपीआय पद्धतीने पैसे भरणाऱ्या अर्जदारांनी त्यांच्या यूपीआय आयडीची माहिती द्यावी, ज्याद्वारे संबंधित रक्कम एससीएसबी (सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बॅंक्स) किंवा यूपीआय प्रणालीमार्फत गोठवली जाईल. ही रक्कम प्रस्तावात सहभागासाठी राखून ठेवली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना प्रस्तावातील अँकर गुंतवणूकदार भागामध्ये एएसबीए प्रक्रियेद्वारे सहभागाची परवानगी नाही. कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) दोन्ही शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. जेएम फायनान्शिअल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे नाव आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. या निवेदनात परिभाषित न केलेले सर्व शब्द रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थानुसारच ग्राह्य धरले जातील.

Read More
BusinessLatest News

फिजिक्सवाला लिमिटेड फिजिक्सवाला लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 पासून होणार सुरू

  पुणे : फिजिक्सवाला लिमिटेड (“COMPANY”) इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर (“Issue”) मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु

Read More
BusinessLatest News

एअर इंडिया एक्सप्रेसच्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश; दिल्ली–अबू धाबी आणि पुणे–अबू धाबी अशी नवीन उड्डाणे सुरू

एअर इंडिया एक्सप्रेस १ December २०२५ पासून नागपूर बेंगळुरूदरम्यान दिवसातून दोन फ्लाइट्स चालवणार आहे. तसेच, २ December २०२५ पासून दिल्ली आणि पुणेहून अबू धाबीला नवीन फ्लाइट्स सुरू करण्यात येणार आहेत. पुणे : भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू कॅरिअर एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश करत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांत

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

माध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका बजवावी – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे

पुणे : आपल्या देशात लोकशाहीचे अंधार युग सुरू आहे. लोकशाही आयसीयु मध्ये आहे. १९५२ ते २०२५ पर्यंत निवडणूक आयोगावर गुन्हेगारी

Read More
BusinessLatest News

केएफआयएल तर्फे आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर,

पुणे : भारतातील अग्रगण्य कास्टिंग्स आणि पिग आयर्न उत्पादक तसेच स्टील आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड

Read More
BusinessLatest News

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सने आपल्या युनिट लिंक्ड जीवन विमा योजनांतर्गत आणला नवा डिव्हिडंड यील्ड फंड

मुंबई : भारतातील एक आघाडीची आर्थिक सेवा कंपनी, आदित्य बिर्ला कॅपिटलची जीवन विमा उपकंपनी, आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (एबीएसएलआय) एक नवा फंड “डिव्हिडंड यील्ड फंड” सुरु केल्याची घोषणा केली आहे. हा फंड एबीएसएलआयच्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन जसे की, वेल्थ इन्फिनिया प्लॅनअंतर्गत (स्टॅन्डअलोन युलिप योजना) उपलब्ध आहे. या फंडाचा मुख्य उद्देश उच्च लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घावधीसाठी संपत्ती निर्माण करण्यात सक्षम बनवणे हा आहे. हा फंड व्हिजन रिटायरमेंट सोल्युशन आणि निश्चित वेल्थ सोल्युशन (कॉम्बो योजना) या योजनांतर्गत उपलब्ध आहे. डिव्हिडंड यील्ड फंडाचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सातत्याने नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन परतावा मिळवणे हे आहे. हा

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

मणिपूर येथील लोंगपी ब्लॅक स्टोन पॉटरी व बनाना फायबर हँडीक्राफ्ट ची पुणेकरांना भुरळ

पुणे  : एखाद्या काळ्या दगडाचा वापर करून त्यामधून स्वयंपाकासाठीची भांडी तयार केली असतील तर त्यामध्ये तयार होणाऱ्या पदार्थांची चव निश्चितच वेगळी

Read More
Latest NewsMAHARASHTRA

कार्तिक वारी दरम्यान पंढरपुरात सुमीत ग्रुप एंटरप्रायजेसकडून भव्य स्वच्छता अभियान

पंढरपूर : सार्वजनिक सेवा आणि सामाजिक उपक्रमातील सहभागाची परंपरा पुढे चालू ठेवत, सुमीत ग्रुप एंटरप्रायजेसने कार्तिकी वारीच्या निमित्ताने आपल्या वार्षिक कॉर्पोरेट

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यातील महापालिका निवडणुकाबॅलेट पेपरवर घ्या -माजी आमदार मोहन जोशी

  पुणे : राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मत पत्रिका) घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष

Read More
BusinessLatest News

ऍक्सिस म्युच्युअल फंडचा नवा ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ

  मुंबई :  भारतातील एक प्रमुख संपत्ती व्यवस्थापन कंपनी, ऍक्सिस म्युच्युअल फंडने नवीन ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ सुरु केल्याची घोषणा आज केली. ही एक नाविन्यपूर्ण ओपन एंडेड योजना आहे. या योजनेचा उद्देश गुंतवणूकदारांना असा गुंतवणूक पर्याय देणे आहे, जो सुरक्षित असेल, ज्यामध्ये परताव्याचे अनुमान लावले जाईल आणि कराचे ओझे देखील कमी असेल. नवीन फंड ऑफर (एनएफओ) २८ ऑक्टोबर २०२५ ला सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल आणि ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहील. या फंडचे व्यवस्थापन करतील – देवांग शाह (फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख), आदित्य पगारिया (सिनियर फंड मॅनेजर), हार्दिक सतारा (सिनियर फंड मॅनेजर) आणि कार्तिक कुमार (फंड मॅनेजर). नवी गुंतवणूक योजना अशा गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना कमी जोखीम (कॉन्झर्वेटिव्ह रिस्क प्रोफाइल) आणि कर भरणा केल्यानंतरचा नफा अधिक जास्त हवा असतो. हा फंड डेटवर आधारित पॅसिव्ह म्युच्युअल फंड योजना आणि आर्बिट्राज फंडांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या गुंतवणूक करून एक हायब्रीड गुंतवणूक साचा तयार करतो, ज्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीमध्ये (काही वर्षात) नियमित परतावा देणे हे आहे. ऍक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ, श्री बी गोपकुमार यांनी सांगितले, “ऍक्सिस म्युच्युअल फंडामध्ये आम्ही नेहमीच अशा नवीन आणि गुंतवणूकदारांवर केंद्रित योजना देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यांची कामगिरी चांगली असेल, आणि ज्या समजून घेणे सोपे देखील असेल. ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ याच विचारातून तयार करण्यात आला आहे. हा फंड स्थिरता, पारदर्शकता आणि कर बचत यांचा अनोखा मिलाप प्रदान करतो. आजच्या काळात बाजारपेठेमध्ये भविष्याचे अनुमान लावणे आणि करपश्चात नफा यांचे महत्त्व वाढले आहे, हा फंड गुंतवणूकदारांना निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीसाठी एक अधिक स्मार्ट मार्ग मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.”   ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफची प्रमुख वैशिष्ट्ये ही योजना आपल्या पोर्टफोलिओपैकी जवळपास ५०-६५% भाग पॅसिव्ह डेट ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवेल, ज्यांचे उद्दिष्ट उच्च गुणवत्तेच्या म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत. अंतर्निहित योजना रोल-डाउन स्ट्रॅटेजीचे पालन करतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना व्याजदराचा धोका कमी करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ घेता येईल. पोर्टफोलिओचा उर्वरित ३५-५०% हिस्सा आर्बिट्राज फंडांमध्ये गुंतवला जातो, ज्यामध्ये पूर्णपणे हेज्ड (कव्हर केलेल्या) इक्विटी पोझिशन्सचा समावेश होतो. हा भाग कमीत कमी अस्थिरतेसह परतावा मिळवण्यासाठी डिझाइन केला आहे, कारण तो बाजाराच्या दिशेवर अवलंबून नाही. या दोन्ही घटकांच्या मिश्रणामुळे, फंड डेट इन्स्ट्रुमेंट्सप्रमाणेच स्थिर परतावा देतो, पण यात कर लाभ अधिक असतो. हा फंड त्याच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी दोन निर्देशांकांचा वापर करतो, ज्यामध्ये ६५% निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट इंडेक्स आणि ३५% निफ्टी ५० आर्बिट्राज टीआरआय (TRI) चा समावेश आहे, जे त्याच्या दुहेरी गुंतवणुकीला दर्शवते. या फंडमध्ये तुम्हाला उच्च तरलता (हाय लिक्विडिटी) मिळते, ज्यामध्ये T+2 रिडेम्पशन पेआउट आणि कोणताही एक्झिट लोड नाही. यामुळे, गुंतवणूकदारांना जलद आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्याची सोय मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अंतर्निहित योजनांना पुनर्संतुलित करताना (रीबॅलन्स), गुंतवणूकदाराला कोणताही कर भरावा लागत नाही, त्यामुळे याची कर बचत क्षमता वाढते. ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफमध्ये गुंतवणूक का करावी: हा फंड अशा सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांना असा गुंतवणूक पर्याय हवा आहे ज्यात जास्त जोखीम नसते, जो स्थिर परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, आणि ज्याचे उद्दिष्ट मध्यम कालावधीत (काही वर्षांसाठी) सातत्यपूर्ण व स्थिर परतावा देणे आहे, उदा. कॉर्पोरेट्स, जास्त गुंतवणूक करणारे व्यक्ती आणि सामान्य किंवा लहान गुंतवणूकदार. फंडाचा जो भाग डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये (जसे की बॉण्ड्स) गुंतवणूक करतो, त्यात ‘रोल-डाउन’ स्ट्रॅटेजीचा वापर केल्यामुळे गुंतवणूक मुदतीपर्यंत ठेवली जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना परताव्याबद्दल स्पष्टता मिळते. फंडाचा दुसरा भाग आर्बिट्राज फंडांमध्ये गुंतवला जातो, जो कमीत कमी अतिरिक्त जोखमीसह परतावा वाढवण्याचे काम करतो. या फंडात गुंतवणूक करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा कर बचत करण्यात सक्षम आहे. पारंपरिक गुंतवणुकींपेक्षा वेगळा आहे. पारंपारिक डेट म्युच्युअल फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मध्ये, तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यावर तुमच्या सध्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. एक्सिस इन्कम प्लस आर्बिट्राज पॅसिव्ह एफओएफ हा फंड वेगळ्या प्रकारे काम करतो. जर तुम्ही या फंडामध्ये २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवल्यास, तुमच्या नफ्यावर लॉन्ग-टर्म कॅपिटल गेन (LTCG) टॅक्स लागू होतो, ज्याचा दर फक्त १२.५% आहे. ऍक्सिस एएमसीचे सीआयओ श्री. आशिष गुप्ता म्हणाले, “सध्याची बाजारपेठ अशा स्थितीत आहे जिथे गुंतवणूकदार स्थिर उत्पन्न साधनांमधून चांगले परतावे मिळवू शकतात आणि गुंतवणूकदार पारंपारिक स्थिर उत्पन्न साधनांसारखे (जसे की फिक्स्ड डिपॉझिट्स) स्थिर परतावा देणाऱ्या परंतु त्याच वेळी त्यांच्यावर लागणारा कर देखील कमी असावा. ऍक्सिस इन्कम प्लस आर्बिट्रेज पॅसिव्ह एफओएफ हा गुंतवणूकदारांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी आलेला एक उपाय आहे. हा फंड निष्क्रिय रोल डाउन धोरणे आणि पूर्णपणे हेज्ड आर्बिट्रेज एक्सपोजर वापरून सुरक्षित, स्थिर आणि पारदर्शक गुंतवणूक पर्याय प्रदान करतो.”   याव्यतिरिक्त, हा फंड गुंतवणूकदारांच्या प्रमुख चिंता दूर करतो – ज्यांना “5Ps” म्हणून संबोधले जाते: बाजारात भरपूर पर्याय उपलब्ध असल्यामुळे योग्य फंड निवडण्यात अडचण, फंड रिटर्नचा अंदाज लावण्याची क्षमता, पोर्टफोलिओ पारदर्शकता, फंड कुठे आणि कसे गुंतवले जातात याबद्दल स्पष्ट माहिती, कर-पश्चात परतावे आणि क्रेडिट धोक्यापासून संरक्षण. उच्च-गुणवत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून, हा फंड क्रेडिट जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याची पॅसिव्ह रचना फंड रिटर्नची पारदर्शकता आणि अंदाज प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते, तर हायब्रिड मॉडेल, कर्ज आणि आर्बिट्रेज फंड एकत्रित करून, पोर्टफोलिओला बाजारातील चढउतारांना अधिक लवचिक बनवते. ते विविधीकरणाद्वारे (वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करून) जोखीम देखील कमी करते.

Read More
BusinessLatest News

रिलायन्स जनरल इन्शुरन्सतर्फे भारताच्या पायाभूत सुविधांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी शुअरटी इन्शुरन्स बिड बॉन्ड सादर

  मुंबई – भारतातील अग्रगण्य खाजगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक रिलायन्स जनरल इन्शुरन्सने शुअरटी इन्शुरन्स – बिड बॉन्ड ही महत्वपूर्ण उपायसुविधा

Read More