Wednesday, June 3, 2026

Day: November 14, 2025

ENGLISH

Indian Institute of Management (IIM), Ranchi wins Cummins India’s Flagship B-School Case Study Competition REDEFINE 2025

  Pune : Cummins in India (“Cummins India”), a leading power technology provider, successfully concluded ‘REDEFINE 2025’, the eighth edition of its prestigious

Read More
ENTERTAINMENTLatest News

दिशाचे डाव, पारूची धडपड आणि आदित्यच्या यशाचा सोहळा

  ‘पारू’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हृदयाला भिडणारी कथा आणि प्रेरणादायी पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पारू आणि आदित्यच्या

Read More
BusinessLatest News

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने बहु-राज्यीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम EMBED यशाचा दशकपूर्ती सोहळा – आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल                          

पुणे  : भारत सरकारने येत्या २०३० सालापर्यंत मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी

Read More
BusinessLatest News

भारतभरातील हजारो जीवनांमध्ये बदल घडवून आणल्यानंतर, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची ‘हंगर फ्री वर्ल्ड’ मोहीम आता जागतिक स्तरावर

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, जगातील पाचव्या क्रमांकाची दागिन्यांची रिटेल कंपनी आणि भारतातील सर्वात आघाडीची सामाजिक जबाबदारी जपणारी संस्था, यांनी त्यांच्या प्रमुख ‘हंगर

Read More
BusinessLatest News

हिंदुजा फाउंडेशनने आपल्या टाईप १ मधुमेह उपक्रमाच्या माध्यमातून १००० पेक्षा जास्त गरजू मुलांना सक्षम बनवले; सर्वसमावेशक देखभालीच्या मॉडेलचा देशभरात विस्तार करण्याचे उद्दिष्ट

मुंबई : ११० वर्षांची कारकीर्द असलेल्या हिंदुजा समूहाची परोपकारी कार्य करणारी संस्था हिंदुजा फाऊंडेशनने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून घोषणा केली आहे की, त्यांनी ‘टाइप १ मधुमेह उपक्रमा’द्वारे (Type 1 Diabetes Initiative – T1DI) मुंबई, पुणे आणि चेन्नईमधील १००० हून अधिक गरजू मुलांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण केला आहे. हा उपक्रम एक अद्वितीय मॉडेल आहे, ज्यामध्ये मुलांना सर्वसमावेशक वैद्यकीय, पौष्टिक आणि भावनिक देखभाल पूर्णपणे निःशुल्क दिली जाते. या फाउंडेशनच्या कामाची सुरुवात एप्रिल २०१९ मध्ये झाली, टाईप १ मधुमेह (T1D) असलेल्या गरजू मुलांना निरोगी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले होते. फक्त सहा वर्षांत, या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांमध्ये रुग्णालयात भरती व्हावे लागण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे आणि एचबीए१सीची सरासरी पातळी १०.४% वरून ७.८% पर्यंत सुधारली आहे. या उपक्रमाने कुटुंबांची आर्थिक स्थिती देखील मजबूत केली आहे आणि विद्यार्थ्यांना तिरंदाजी आणि बुद्धिबळ यांसारख्या राज्यस्तरीय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले आहे. भारतात सध्या टाईप १ मधुमेह (T1D) असलेल्या मुलांची संख्या जगात सर्वाधिक आहे. या केसेसमध्ये दरवर्षी जवळपास ६.७% दराने वाढ होत आहे, ज्यामुळे सर्वांना समान, आजीवन मधुमेह देखभाल मिळण्याची किती निकड आहे ते अधोरेखित होते. हिंदुजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रमण कल्याणकृष्णन यांनी सांगितले, “टाइप १ मधुमेह ही केवळ एक वैद्यकीय स्थिती नाही, तर धैर्य, शिस्त आणि आशेचा एक आजीवन चालणारा प्रवास आहे. T1DI च्या माध्यमातून, आम्ही प्रत्येक मुलाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबतीला आहोत, त्यांना सहानुभूतीपूर्ण, समुदाय आधारित काळजीद्वारे उपचार मिळवण्यात, जुळवून घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यात मदत करत आहोत.” ‘द टाईप १ डायबेटिस इंडिया‘ (T1DI) हा उपक्रम, पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन अँड डॉ. मोहनस् डायबेटिस स्पेशालिटीज सेंटर आणि केईएम हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलांना सर्वसमावेशक साहाय्य पुरवले जाते, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: मोफत इन्सुलिन, निदान आणि तपासणी, समुपदेशन, समूह शिक्षण मंच (म्हणजेच इतर रुग्णांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून शिकणे आणि अनुभव शेअर करणे) या सर्वांच्या माध्यमातून, गरजू मुलांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सहानुभूतीपूर्ण देखभाल प्रदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वैद्यकीय मदत म्हणून सुरू झालेला हा प्रवास लवकरच एक परिवर्तनाची गाथा बनला. यामध्ये ४० हून अधिक मुलांना इन्सुलिन पंप्स देण्यात आले. यात २० प्रगत स्वयंचलित इन्सुलिन वितरण प्रणालींचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांना अधिक परिपूर्ण, निरोगी जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. पुण्यामध्ये, हिंदुजा फाउंडेशन आणि केईएम हॉस्पिटल यांनी ‘क्लबवन’ (ClubOne) नावाचा एक उत्साही पीअर-सपोर्ट प्लॅटफॉर्म (peer-support platform) तयार केला आहे, जो रुग्णांमध्ये कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि आशा वाढवतो.

Read More
Latest NewsPUNE

पवित्रम् फाऊंडेशनकडून ‘पवित्रम्’ मोबाईल ॲप चे लोकार्पण रविवारी

हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एकत्र आणणारे डिजिटल व्यासपीठ पुणे : हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पवित्रम्

Read More
Latest NewsPUNE

कसब्यात क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्साहात साजरी

पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. मुख्य जन्मसोहळ्याच्या निमित्ताने लघुरुद्र,

Read More
Latest NewsPUNE

गंमत जत्रेत बालवीरांनी घेतला भारतीय खेळांचा निखळ आनंद

पुणे : हत्तीला शेपूट लावणे…विटांवरून चालणे… डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे… दोरीच्या उड्या… यांसारख्या पारंपरिक भारतीय खेळांचा आनंद बालवीरांनी गंमत जत्रेत

Read More
Latest NewsPUNE

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

पुणे :  संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विभागनिहाय नेमलेल्या नोडल

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती – संजय राऊत

मुंबई:  बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बाईपण जिंदाबाद!’ ‘शर्ट’ मध्ये उलगडणार स्त्रीत्वाचा नवा पैलू

मराठी टेलिव्हिजन विश्वात गोष्ट सादर करण्याचा नवा प्रयोग असलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरलेली कलर्स मराठीवरील ‘बाईपण जिंदाबाद’ ही मालिका

Read More