Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सने आपल्या युनिट लिंक्ड जीवन विमा योजनांतर्गत आणला नवा डिव्हिडंड यील्ड फंड

मुंबई : भारतातील एक आघाडीची आर्थिक सेवा कंपनी, आदित्य बिर्ला कॅपिटलची जीवन विमा उपकंपनी, आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (एबीएसएलआय) एक नवा फंड “डिव्हिडंड यील्ड फंड” सुरु केल्याची घोषणा केली आहे. हा फंड एबीएसएलआयच्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन जसे की, वेल्थ इन्फिनिया प्लॅनअंतर्गत (स्टॅन्डअलोन युलिप योजना) उपलब्ध आहे. या फंडाचा मुख्य उद्देश उच्च लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घावधीसाठी संपत्ती निर्माण करण्यात सक्षम बनवणे हा आहे. हा फंड व्हिजन रिटायरमेंट सोल्युशन आणि निश्चित वेल्थ सोल्युशन (कॉम्बो योजना) या योजनांतर्गत उपलब्ध आहे.

डिव्हिडंड यील्ड फंडाचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सातत्याने नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन परतावा मिळवणे हे आहे. हा फंड अशा गुणवत्तापूर्ण कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो ज्यांचे व्यवसाय मॉडेल मोठ्या प्रमाणावर विकसित केले जाऊ शकतात आणि ज्या गुंतवणूकदारांना नियमितपणे लाभांश देतात. यामुळे गुंतवणूकदारांना स्थिरता, वाढ आणि उत्पन्नाचे संतुलित मिश्रण मिळते. स्पष्ट व्यावसायिक योजना, मजबूत नेतृत्व, शाश्वत वाढीची क्षमता आणि लाभांश देण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या कंपन्यांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करून, हा फंड दीर्घावधीमध्ये निरंतर मूल्य देण्याचा प्रयत्न करतो. हा फंड चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून नियमित उत्पन्न आणि भांडवल वाढ दोन्ही मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री कमलेश राव यांनी सांगितले, “आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स डिव्हिडेंड यील्ड फंड पॉलिसीधारकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत, लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. आजच्या बाजारपेठेतील वातावरणात, जिथे वाढीइतकेच स्थैर्य महत्त्वाचे आहे, तिथे असे व्यवसाय स्थिर आणि सातत्यपूर्ण मूल्यनिर्मिती देतात. हा फंड कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांना दिलेल्या वचनाची पूर्तता सुनिश्चित करतो. हा फंड एक असे साधन आहे जे ग्राहकांच्या गुंतवणुकीला सुरक्षा आणि कामगिरी यांचे संतुलित मिश्रण देते. यामागचा उद्देश हा आहे की ग्राहक कोणत्याही काळजीशिवाय, पूर्ण आत्मविश्वासानिशी त्यांच्या भविष्यासाठी ठरवलेली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करू शकतील.”

 

फंडाची प्रमुख माहिती:

  1. इक्विटीमधीलगुंतवणूक: एबीएसएलआय डिविडेंड यील्ड फंड १००% पर्यंत इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो. हा निधी मुख्यत्वे (किमान ७५%) अशा कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करतो, ज्या नियमितपणे लाभांश देतात.
  2. मालमत्तावाटप: ८०–१००%: इक्विटीमध्ये. २०% पर्यंत: डेट इंस्ट्रूमेंट्स (कर्ज साधने), मनी मार्केट (मुद्रा बाजार), आणि रोख रकमेमध्ये (कॅशमध्ये).

III. फंड व्यवस्थापन धोरण:  हा फंड सक्रिय फंड व्यवस्थापन धोरणाचे पालन करतो. मजबूत पायाभूत तत्त्वे असलेल्या आणि उच्च लाभांश-उत्पन्न देणाऱ्या कंपन्या ओळखण्याच्या उद्देशाने, ‘बॉटम-अप’ स्टॉक निवड धोरणासाठी हा एक उत्तम संधी प्रदान करतो.

  1. महत्त्वाच्यातारखा: हा नवीन गुंतवणूक फंड ६ नोव्हेंबर, २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. सबस्क्रिप्शन कालावधी दरम्यान, हा निधी १० प्रति युनिटच्या प्रारंभिक एनएव्ही (NAV – निव्वळ मालमत्ता

मूल्य) दराने उपलब्ध असेल. सबस्क्रिप्शन २० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत करता येईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading