Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

केएफआयएल तर्फे आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर,

पुणे भारतातील अग्रगण्य कास्टिंग्स आणि पिग आयर्न उत्पादक तसेच स्टील आणि सीमलेस ट्यूब्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड (BSE : 500245) ने आज आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीचे लेखापरीक्षण न केलेले आर्थिक निकाल जाहीर केले.

आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना केएफआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आर. व्ही. गुमास्ते म्हणालेदुसरी तिमाही ही केएफआयएलसाठी मिश्र अनुभवाची ठरली. एका बाजूला सर्व उत्पादनांची स्थिर मागणी दिसली तर दुसऱ्या बाजूला लोखंड आणि स्टील विभागात मार्जिनवरील ताण जाणवला. ट्रॅक्टर आणि ऑटोमोटिव्ह उद्योगांकडून कास्टिंग्ससाठी मजबूत मागणी या तिमाहीत पाहायला मिळाली. कामकाजामधून महसूल वार्षिक 4% ने वाढला असूनवर्ष ते दिनांक वाढ 6% इतकी झाली आहे. 92 कोटी रु. च्या निव्वळ नफ्याने वार्षिक 9% वाढ नोंदवली आहे. आम्ही कास्टिंग्सट्यूब्स आणि स्टील व्यवसायात मजबूत व्हॉल्युम वाढ अनुभवली. रिअलायझेशनमध्ये घट आणि कमोडिटी हेडविंड्स असूनहीआम्ही आमच्या टॉपलाइन आणि नफा या दोन्ही बाबतीत मजबूत कामगिरी कायम ठेवली आहे. ऑलिव्हर इंजिनिअरिंग उत्पादन वाढवत असताना आणि ONGC च्या ऑर्डरमुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी आमच्या ट्यूब व्हॉल्युमला स्थिरता मिळाल्यानेआम्ही सातत्यपूर्ण कामगिरीकडे वाटचाल करत आहोत.

 

स्वतंत्र आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा:

 आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी कामकाजामधून मिळालेला महसू वार्षिक 4% वाढीसह  1,728.0 कोटी रु. झाला. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी तो 1,667.1 कोटी रु. होता

 आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी EBITDA* 213.6 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 195.4 कोटी रु.वार्षिक 9% वाढ

 आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी EBITDA* मार्जिन 12.4%, तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 11.7%

 आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी PBT# 125.9 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 115.1 कोटी रु.वार्षिक 9% वाढ

 आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी PAT 92.3 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 84.9 कोटी रु.वार्षिक 9% वाढ

संयुक्त आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा:

·         आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी कामकाजा मधून मिळणारा महसूल 1,755.3 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 1,666.0 कोटी रु.वार्षिक 5% वाढ

·         आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी EBITDA* 214.4 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 194.1 कोटी रु.वार्षिक 10% वाढ

·         आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी EBITDA* मार्जिन 12.2%, तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 11.6%

·         आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी PBT# 119.9 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 107.8 कोटी रु.वार्षिक 11% वाढ

 आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीसाठी PAT 86.3 कोटी रु.तर आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाही साठी 77.6 कोटी रु.वार्षिक 11% वाढ

 

*इतर उत्पन्न आणि अपवादात्मक घटक वगळून

#अपवादात्मक घटक वगळून

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading