Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

रिलायन्स जनरल इन्शुरन्सतर्फे भारताच्या पायाभूत सुविधांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी शुअरटी इन्शुरन्स बिड बॉन्ड सादर

 

मुंबई – भारतातील अग्रगण्य खाजगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक रिलायन्स जनरल इन्शुरन्सने शुअरटी इन्शुरन्स – बिड बॉन्ड ही महत्वपूर्ण उपायसुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे उत्पादन कंत्राटदारांना पारंपरिक बँक हमीच्या तुलनेत अधिक कार्यक्षमकिफायतशीर आणि नॉन-कॉलॅटरल-आधारित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

हे सादरीकरण सार्वजनिक खरेदीच्या बदलत्या गरजा आणि नियामक चौकटींना पाठबळ देते. विविध क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा सहभाग वाढवत बिड सिक्युरिटीजसाठी जलद आणि सुलभ मार्गाने भांडवल पुरविते.

शुअरटी बिड बॉन्ड हा कंत्राटदार (Principal), प्रकल्प मालक (Beneficiary) आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Surety) यांच्यातील एक त्रिपक्षीय करार आहे. त्यामध्ये कंत्राटदाराने बोली जिंकली तर तो त्याचे पालन करून करार पूर्ण करेल याची हमी दिली जाते.

सादरीकरणाच्या वेळी रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश जैन म्हणाले: आमचे शुअरटी इन्शुरन्स बिड बॉन्ड उत्पादन भारतातील कंत्राटदार समुदायासाठी एक शक्तिशाली साधन आहे. पारंपरिक बँक हमींवरील अवलंबित्व कमी करून आम्ही महत्त्वाचे कार्यात्मक खेळते भांडवल खुले करत आहोतव्यवसाय सुलभता वाढवत आहोत आणि आमच्या ग्राहकांना पायाभूत सुविधा विकासात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होण्यास सक्षम करत आहोत. आमचा भर माहितीपूर्णकॅपिटल लाइट आणि ग्राहक-केंद्रित विमा-आधारित उपायसुविधा विकसित करण्यावर असून हे उत्पादन त्याचेच प्रतिबिंब आहे.

निश्चित लक्ष्य असलेल्या विभागांमध्ये रस्तेपूल आणि महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. तिथे वेळेत बोली सादरीकरण आणि आर्थिक लवचिकता अत्यावश्यक आहे. हे वाढत्या अक्षय ऊर्जा आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रालाही पाठबळ देते. त्यामुळे भांडवल अडकवून न ठेवता टेंडरमध्ये सुलभ सहभाग मिळणे शक्य होते. याशिवायट्रान्समिशन आणि ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्यूरमेंट आणि कनस्ट्रक्शनकरारांनाही बिड बॉन्ड जारी करण्याच्या सोप्या आणि वेगवान प्रक्रियेचा फायदा होतो. सार्वजनिक टेंडरमधील अनुपालनकार्यक्षमता आणि बँक मर्यादांपासून मुक्त सहभाग सुनिश्चित करत विविध क्षेत्रांतील सरकारी खरेदी बोलींनाही शुअरटी इन्शुरन्सचा फायदा होतो.

भारताच्या पायाभूत सुविधांच्या आकांक्षांशी सुसंगत राहत शुअरटी इन्शुरन्स बिड बॉन्डचे सादरीकरण करत रिलायन्स जनरल इन्शुरन्स भारतीय कंत्राटदारांसाठी आर्थिक लवचिकता खुली करण्याचे उद्दिष्ट ठेवते. ही उपाय सुविधा प्रकल्प बोली प्रक्रियेत पारदर्शकतालवचिकता आणि सुलभता वाढवण्यासाठी सज्ज आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading