Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

आरोपींना पाहताच फुगेवाडीकरांचा संताप उसळला


पिंपरी-चिंचवड : फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा रोष सोमवारी पुन्हा एकदा उफाळून आला. या प्रकरणातील आरोपींना तपासासाठी आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी सीआयडीच्या पथकाने फुगेवाडीत आणल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सीआयडीकडून घटनास्थळी तपासाची प्रक्रिया सुरू असताना मोठ्या संख्येने नागरिक तेथे जमले होते. तपासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेले जात असताना नागरिकांचा संताप अनावर झाला.
काही नागरिकांनी आरोपींकडे धाव घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिस आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपींना सुरक्षितपणे तेथून हलवले.
फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेबाबत नागरिकांमध्ये अजूनही तीव्र नाराजी आणि संताप कायम असल्याचे सोमवारी पुन्हा दिसून आले. तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading