Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

थायलंड येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी शशिकांत कांबळे यांची निवड

पुणे : संयुक्त राष्ट्राच्या वतीने थायलंड येथे आयोजित संयुक्त राष्ट्र व्यवसाय आणि मानवाधिकार मंच, आशिया-पॅसिफिक (UNRBHR २०२५)  परिषदेसाठी पुण्यातील शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. थायलंड येथे 16 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून विविध 70 देशातील प्रतिनिधि सहभागी होणार आहेत. या परिषदेचा हेतु संकटातून मानवी हक्कांवर प्रगतीचे आराखडा तयार करणे आणि प्रादेशिक नेतृत्व मजबूत करणे हा आहे. शशिकांत कांबळे स्वान फाउंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र च्या वतीने कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. शशिकांत कांबळे हे भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हूणन ही 12 वर्ष काम करत होते. त्याच बरोबर भारतीय गुणवता परिषद चे ते सदस्य म्हणून काम करत होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading