Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक – प्रकाश आंबेडकर

मुंबई: प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत वंचित बहुजन आघाडी  प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना केला.

मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून संबोधने हा सामाजिक मूर्खपणा असल्याचे मत मुंबई सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे कुणबी ही जात नसून व्यवसायवाचक शब्द आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकाल पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्याचे सरकारचे आश्वासन मराठ्यांची फसवणूक करणारे आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण केले असताना सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या  मान्य केल्या. त्यात सर्वात महत्त्वाची मागणी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची होती. त्यासाठी सरकारने शासन आदेश जारी केला. त्या आदेशानुसार रक्ताच्या नात्यातील कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना योग्य कागदपत्र सादर करून कुणबी प्रमाणपत्र मिळेल, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, ही सरकारकडून करण्यात आलेली मराठा आरक्षण आंदोलन आणि मराठा समाजाची फसवणूक असल्याचा जावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

या शासन निर्णयाने केवळ मराठा आंदोलन आणि मराठा समाज यांनाच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती आणि त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीची ही फसवणूक केली आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading