Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमित ठाकरे यांनी घेतली आशिष शेलार यांची भेट

 

कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा ठाकरे यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. कालच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या पाठोपाठ अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे.

सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य मोहोत्सव म्हणून जाहीर केले आहे. मात्र, काही अभिमत विद्यापीठे आणि खाजगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालय यांनी गणेशोत्सवाच्या काळात परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना गणेशोत्सवापासून दूर केल्यासारखे आहे. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यकच आहे. त्यामुळे या काळातील परीक्षांची वेळापत्रक रद्द करण्यात यावी आणि अशा विद्यापीठ, महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मनसेच्या वतीने शेलार यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गणेशोत्सवाच्या काळात कुठलीही परीक्षा होऊ देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading