… हा खांदेपालट म्हणजे नादी लावण्याचे उद्योग जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर टीका
जालना: प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीचे नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देणे म्हणजे केवळ नादी लावण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
टिकाऊ मराठा आरक्षण देण्याचे मार्ग सुचविण्यासाठी यापूर्वी देखील समिती नियुक्त करण्यात आली होती सर्वात प्रथम नारायण राणे त्यानंतर अशोक चव्हाण यांनी त्या समितीचे नेतृत्व केले. आता ती जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलन या खांदेपालटामुळे समाधानी नाहीत. आमच्या मागण्यांसाठी 27 तारखेला आम्ही मुंबईकडे यायला निघणारच. यापूर्वी सरकारला आरक्षणाबाबत काही निर्णय घेण्याची संधी आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
धनगर समाजाचे आरक्षण आणि मराठा समाजाचे आरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे धनगर समाजाने आपल्या आंदोलनाला विरोध करू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला केले आहे.
