Thursday, September 17, 2026
BusinessLatest News

किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या नव्या इथॅनॉल आणि आयसोब्युटेनॉल इंजिन्सचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

 

पुणे : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (केओईएल) या कंपनीने आपले अत्याधुनिक इथॅनॉल आणि आयसोब्युटेनॉल इंजिन तंत्रज्ञान नुकतेच सादर केले. जेनसेटच्या अॅप्लिकेशनसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या जगातील पहिल्या इंजिनचे परीक्षण एआरएआयने केले आहे. रस्तेवाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेले हे लोकार्पण, भारताच्या ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या प्रवासात पर्यायी इंधनाची योजना हा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित करणारे ठरणारे आहे.

जागतिक जैवइंधन दिनाच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या नव्या इंजिनद्वारे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील आपले नेतृत्व पुन्हा अधोरेखित केले. पर्यायी इंधनांवर लक्ष केंद्रित करून, राष्ट्रीय ऊर्जा विविधीकरणाच्या उद्दिष्टांना पाठबळ देत आणि कमी-कार्बनयुक्त भविष्याकडे संक्रमणाला गती देत कंपनीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

या लोकार्पणावेळी किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सहाई म्हणाले, “इंजिनाची ही नवकल्पना सर्वांसाठी अधिक स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी देते. इथॅनॉल आणि आयसोब्युटेनॉल इंजिन्सद्वारे आम्ही केवळ पर्यायी इंधनांचा स्वीकार करीत नाही, तर देशाच्या ऊर्जा विविधीकरण आणि पर्यावरणीय उद्दिष्टांनाही हातभार लावीत आहोत.”

या नव्या इंजिन्समध्ये कंबश्चनचे प्रगत तंत्रज्ञान असून ते हरितगृह वायूंचे उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करते. इथॅनॉल आणि आयसोब्युटेनॉलसारख्या नूतनीकरणक्षम जैवइंधनांशी सुसंगत असल्यामुळे जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते. विविध औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांसाठी सक्षम कार्यक्षमतेसह तयार करण्यात आलेली ही इंजिन्स पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि संसाधनांचा योग्य वापर करून शाश्वत उत्पादने साध्य करतात.

हे लोकार्पण किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीच्या ‘सीमाहीन भविष्याकरिता नवकल्पना’ या ध्येयाशी सुसंगत आहे. उद्योग, व्यवसाय आणि समुदाय यांना विश्वासार्ह ऊर्जा उपलब्ध करून देत त्यांचा कार्बन ठसा कमी करण्यास ते सक्षम करते. आपल्या इंजिन्सच्या संचात नूतनीकरणक्षम इंधन तंत्रज्ञानाचा समावेश करून, केओईलने भारत सरकारच्या स्वच्छ ऊर्जेला चालना दिली असून खनिज तेलाची आयात कमी करण्याच्या उद्दिष्टांना बळकटी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading