Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात

 

जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी सुखरूप

बीड: प्रतिनिधी

रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील लिफ्टमध्ये असताना ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. मात्र, ते आणि त्यांचे साथीदार सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर पडले.

शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटून जरांगे पाटील लिफ्टने खाली येत असताना हा अपघात घडला.

सध्या मराठा आरक्षण आंदोलन सुरू नसले तरी जरांगे पाटील विविध सामाजिक विषयात कार्यरत आहेत. मागील काही काळापासून ते बीड जिल्ह्यातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेषतः हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडे यांच्या विधवा पत्नी ज्ञानेश्वरी यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे त्यांचे बीड दौरे वाढल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading