Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

अण्णा भाऊ साठेंनी माणूस केंद्रस्थानी ठेवून लेखन केले – भारत सासणे


— लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाजरत्न पुरस्कार सोहळा संपन्न—
पुणे :  लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी माणूस केंद्रस्थानी ठेवून ,त्याचे दुःख,प्रश्न समाजापुढे मांडले .आज अण्णा भाऊ साठे यांना अपेक्षित असणारी समता समाजात निर्माण होणे गरजेचे आहे असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले .लोकसाहिर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते .

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त,जयंतीच्या पूर्वसंध्येला समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,यावर्षी सामाजिक व राजकीय क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान देणारे नेते स्व .हनुमंत साठे यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरिय समाजरत्न पुरस्कार सोहळा- 2025 चे आयोजन लोकशाहीर आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद राम शिंदे सरचिटणीस सुमन राम शिंदे यांनी केले होते .

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे सामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. भारत सासणे हे आहेत. तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर सर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविधक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रल्हाद उर्फ ब भाऊसाहेब सोनवणे, सिताराम उर्फ दादा साहेब सोनवणे प्रा. डॉ दिलीप अर्जुने ,सुजित रणदिवे, लोकशाहिर सदाशिव भिसे, इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुहास नाईक, डॉ. नारायण डोलारे, प्रा. ईश्वर भिसे, आदी मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला यावेळी स्वागताध्यक्ष प्रा.माणिक सोनवणे ,सौ.सुमन राम शिंदे उपस्थिती होत्या. यावेळी सूत्रसंचालन डॉ.उज्ज्वला मोरे यांनी केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading