दिवंगत नेते हनुमंत साठे पुरस्कार विशाल शेवाळे यांना जाहीर
पुणे : आंबेडकरी चळवळीचे नेते दिवंगत हनुमंत साठे यांच्या नावे दिला जाणारा यंदाचा दुसरा हनुमंत साठे पुरस्कार डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेचे अध्यक्ष विशाल शेवाळे यांना जाहीर करण्यात येत आहे .अशी माहिती संस्थेचे मातंग समज समन्वय समितीचे समन्वयक प्रकाश वैराळ,विकास सातारकर,दत्ता जाधव ,रवी आरडे यांनी दिली आहे .
मातंग समाज समन्वयक पुरस्कार समिती पुणे यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल विशाल भाऊ शेवाळे यांना रिपब्लिकन दिवंगत नेते हनुमंतराव साठे पुरस्कार २०२५ समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे .हा पुरस्कार १ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने सारसबाग येथे सकाळी ११.३० वा. पुरस्कार देण्यात येणार आहे .
