जगातील पहिल्या हायब्रिड एन्डोस्कोपिक-मायक्रोस्कॉपिक ईएनटी स्कील लॅबचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे उद्घाटन
पुणे : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे जगातील पहिले हायब्रिड एन्डोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक ईएनटी स्कील लॅब – एन्डोल्पे स्किल लॅब दोन हातांनी एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून पहिल्या हायब्रिड टेम्पोरल बोन डिसेक्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले, ज्यात भारतभरातून निवडक 20 ईएनटी सर्जन्स आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
जगातील पहिली हायब्रिड एन्डोस्कोपिक-मायक्रोस्कोपिक ईएनटी (कान, नाक, घसा) स्किल लॅब ‘एन्डोल्पे स्किल लॅब‘ चे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे उद्घाटन झाले आहे. युएस-पेटंटेड एन्डोहोल्ड प्रणालीसह भारत आता ईएनटी प्रशिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर नेतृत्व करत आहे.
या क्रांतिकारी उपक्रमाचे श्रेय डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पाटील यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि सातत्यपूर्ण पाठबळाला जाते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात उतरवला गेला आणि ईएनटी व हेड-नेक सर्जरी विभागासाठी ही आधुनिक प्रशिक्षण सुविधा साकार झाली.
इंडोप्ले स्किल लॅब ही पारंपरिक मायक्रोस्कोपी व आधुनिक दोन हातांनी होणाऱ्या एन्डोस्कोपिक तंत्रांमध्ये सेतू निर्माण करणारी, पूर्णपणे एकत्रित कॅडॅव्हरिक डिसेक्शन युनिट आहे. या लॅबचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इंडोहोल्ड प्रणाली – ही एक जागतिक स्तरावर पेटंट मिळालेली अभिनव संकल्पना असून ती डॉ. मुबारक मुहम्मद खान, डॉ. सपना परब आणि डॉ. शिरीन खान यांनी विकसित केली आहे. लॅबमध्ये डॉ. खान्स क्रीशन्स मार्फत तयार करण्यात आलेल्या १५ हून अधिक शस्त्रक्रिया नवकल्पनांचा समावेश असून, त्या ईएनटी विशेषतः कर्ण व न्यूरो-कर्णशस्त्र क्षेत्रातील शस्त्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष आणि समृद्ध प्रशिक्षणाचा अनुपम अनुभव प्रदान करतात.
लॅबचे उद्घाटन डॉ. यशराज पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी अधिष्ठाता डॉ. रेखा अर्कोट, मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता, उपस्थित होत्या. या पहिल्या यशस्वी वर्कशॉपचे श्रेय प्रोफेसर व विभागाचे प्रमुख डॉ. मयूर इंगळे यांच्या मेहनतीला जाते, तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित एएनटी तज्ज्ञ प्रो. शशिकांत म्हसाळ (HBT मेडिकल कॉलेज, मुंबई), प्रो. विनोद शिंदे (DYP मेडिकल कॉलेज), डॉ. किनारी राठोड आणि डॉ. रिजवान मेमन (अहमदाबाद) यांनी देखील यात सहभाग घेतला.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले, “आमच्या संस्थेचा भविष्याचे आरोग्यसेवा नेते घडवण्याचा एक गौरवशाली वारसा आहे आणि या वारशाचा आम्हाला अभिमान आहे. त्याच परंपरेला अनुसरून आम्ही शिक्षण, पायाभूत सुविधा किंवा नवोपक्रम यामध्ये नेहमीच सर्वोत्तम गोष्टी घेऊन येत आहोत. एन्डोल्पे स्किल लॅब सारख्या प्रगत प्रयोगशाळा स्थापन करणे म्हणजे आमच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची साधने उपलब्ध करून देण्याच्या आणि शिकणे, संशोधन व उत्कृष्टतेसाठी प्रेरणा निर्माण करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सांगितले, “डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात आम्ही शिक्षणातील नवोपक्रम आत्मसात करून भविष्यकालीन वैद्यकीय व्यावसायिक घडवण्यावर विश्वास ठेवतो. जगातील पहिले हायब्रिड ईएनटी स्कील लॅब सुरू करणे ही परिवर्तनशील शिक्षणासाठी असलेल्या आमच्या कटिबद्धतेची साक्ष आहे. शस्त्रक्रिया प्रशिक्षणाच्या क्षेत्रात भारताने जागतिक पातळीवर नवा आदर्श निर्माण केला आहे आणि तोही पुण्यासारख्या शहरातून – ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.”
आगामी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ : SEOCON 2025
एन्डोल्पे स्किल लॅब ही लॅब येत्या SEOCON 2025 या आंतरराष्ट्रीय ईएनटी परिषदेसाठी मुख्य डिसेक्शन केंद्र म्हणून कार्य करणार आहे. ही परिषद ११ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे आयोजित होणार आहे. जगभरातून येणाऱ्या सर्जन्सना या अत्याधुनिक हायब्रिड प्रशिक्षण प्रणालीचा अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील, यांनी सांगितले, “ही स्कील लॅब केवळ एक पायाभूत सुविधा नाही, तर जागतिक दर्जाच्या ईएनटी शस्त्रक्रिया प्रशिक्षणाच्या दिशेने नेणारे दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे. आमची संस्था या परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र च्या अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कॉट, यांनी सांगितले, “एन्डोल्पे स्किल लॅब ही आमच्या शैक्षणिक परिसंस्थेतील एक ऐतिहासिक भर आहे. ही लॅब विद्यार्थ्यांना व सर्जन्सना मायक्रोस्कोपिक आणि एन्डोस्कोपिक दोन्ही तंत्र एकत्रितपणे आत्मसात करण्याची अद्वितीय संधी देते. अशा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षणामुळे आमचे विद्यार्थी जागतिक शस्त्रक्रिया मानकांवर केवळ पोहोचत नाहीत, तर त्याहून पुढे जातात.”
डॉ. मयूर इंगळे, प्राध्यापक, कर्ण-नाक-घसा विभाग, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “एन्डोल्पे स्किल लॅब हे ईएनटी शस्त्रक्रिया प्रशिक्षणामध्ये एक गेम-चेंजर ठरले आहे. प्रथमच आम्ही अशी हायब्रिड प्रणाली सादर करत आहोत, जी मायक्रोस्कोपिक आणि दोन हातांनी होणारे एन्डोस्कोपिक डिसेक्शन कॅडॅव्हरिक सेटिंगमध्ये शिकण्याची संधी देते. भारतात अशा प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण याआधी उपलब्ध नव्हते. ही जगातील दर्जाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्या दूरदृष्टीपूर्ण व्यवस्थापनाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
जसजसे ईएनटी शस्त्रक्रिया मिनिमल ऍक्सेस आणि प्रगत पुनर्रचनेच्या दिशेने विकसित होत आहे, तसतसे पुण्यात स्थापन झालेली एन्डोल्पे हायब्रीड स्किल लॅब भारताचे जागतिक स्तरावरील नेतृत्व अधोरेखित करत आहे — जे पुढील पिढीच्या कर्णशस्त्र तज्ज्ञांना अधिक अचूकता, नवकल्पना आणि जागतिक मानकांसह प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.
