Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNESports

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने जागतिक विद्यापीठ स्पर्धेत पटकाविले कांस्यपदक

पुणे :  नुकतेच जर्मनी येथे पार पडलेल्या फीसु जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारतीय विद्यापीठ टेनिस (मुली) या संघाचे वैष्णवी प्रतिनिधित्व करीत होती.

बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे ची विद्यार्थिनी असलेली वैष्णवी आडकर. जिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करून विद्यापीठाला अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रवेश करून दिला होता. त्या बळावर विद्यापीठाचा संघ खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेकरीताही पात्र ठरला आहे.

या विजयाबद्दल सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलुगुरु डॉ. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे मॅडम, प्रभारी सहायक क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी वैष्णवी तसेच भारतीय विद्यापीठ टेनिस संघाचे अभिनंदन केले आहे.

यापूर्वी तत्कालीन पुणे विद्यापीठाचे श्री. नंदन बाळ यांनी रौप्य पदक या स्पर्धेत जिंकले होते. (१९७९ मध्ये)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading