Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

येस बँकेच्या आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या तिमाहीचे निकाल: कॉस्ट ऑफ फंड्समध्ये घट झाल्यामुळे निव्वळ नफ्यात वार्षिक 59% ची वाढ होऊन तो 801 कोटींवर गेला

ठळक वैशिष्ट्ये:

  • आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 801 कोटी रुपये, वार्षिक वाढ 59.4% तर तिमाहीतील वाढ 8.5%. सलग 7 व्या तिमाहीत PAT मध्ये  सुधारणा.
  • आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील ऑपरेटिंग नफा 1,358 कोटी रुपये, वार्षिक 53.4% तर तिमाहीत 3.3% ची वाढ. सलग चौथ्या तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यात सुधारणा.
  • गेल्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत NIM 2.5% वर स्थिर. वार्षिक 10 बीपीएस वाढ.
  • आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या तिमाहीतील व्याज नसलेले उत्पन्न 1,752 कोटी रुपये, वार्षिक 46.1% ची वाढ तर तिमाहीत 0.6% वाढ.
  • एकूण ठेवींमध्ये वाढ (वार्षिक 4.1% वाढ) आणि CASA गुणोत्तरात सुधारणा होऊन 32.8% पर्यंत (वार्षिक 200 बीपीएसची वाढ).
  • व्यावसायिक बँकिंग आणि मायक्रो बँकिंगमध्ये (अनुक्रमे 19% आणि 11.2% वार्षिक वाढ) मजबूत वाढीमुळे निव्वळ प्रगती 2,41,024 कोटी रुपये, वार्षिक 5% वाढ.
  • स्थिर मालमत्ता गुणवत्ता मेट्रिक्स: GNPA 1.6% वर, NNPA 0.3%, PCR 80.2% पर्यंत सुधारला.

मुंबई : भारतातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक – येस बँकेने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालानुसार निव्वळ नफ्यात वार्षिक 59.4% ची वाढ होऊन तो 801 कोटी रुपयांवर गेला आहेतर तिमाहीत 8.5% वाढ झाली आहे. बँकेचा ऑपरेटिंग नफा 1,358 कोटी रुपयांवर गेला आहेजो वार्षिक 53.4% तर तिमाहीत 3.3% ची वाढ दर्शवतो.

आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ₹2,371 कोटी होते, जे वार्षिक 5.7% तर तिमाहीत 4.2% ने वाढले. या तिमाहीत निव्वळ व्याज मार्जिनमध्ये (NIM) 2.4% ची वाढ झाली. आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत व्याज नसलेले उत्पन्न वार्षिक 46.1% ने तर तिमाहीत 0.7% नी वाढून ₹1,752 कोटी झाले.

आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यामध्ये देखील चांगलीच वाढ झाली. ऑपरेटिंग नफा वार्षिक 53.6% आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत 3.3% नी वाढून 1,358 कोटी झाला. सलग पाचव्या तिमाहीत बँकेने आपले खर्च आणि उत्पन्नाचे गुणोत्तर यशस्वीरित्या कमी केले आहे. आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत हे गुणोत्तर 67.1% वर आले, जे आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत 67.3% एवढे होते.

आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या तिमाहीत मालमत्तेवरील परतावा (RoA) देखील वाढला. आर्थिक वर्ष 24च्या चौथ्या तिमाहीतील 0.7% वरून या तिमाहीत तो 0.8% वर आला.

बॅलन्स शीटमध्ये सातत्याने सकारात्मकता दिसते आहे. एकूण ठेवींमध्ये वार्षिक 4.1% ची वाढ होऊन ती 2,75,843 कोटी रुपये झाली. CASA रेशोमध्ये देखील लक्षणीय सुधारणा दिसली. तिमाहीत तो 200 bps ने वाढून 32.8% झाला. व्यावसायिक बँकिंग आणि मायक्रोबँकिंग विभागातील मजबूत वाढीमुळे नेट ऍडव्हान्समध्ये वार्षिक 5% ची वाढ होऊन तो 2,41,024 कोटी रुपये एवढा झाला.

निकाल आणि आर्थिक कामगिरीबद्दल भाष्य करताना येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. प्रशांत कुमार म्हणाले, “नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करताना बँकेची परिस्थिती अत्यंत भक्कम होती. निव्वळ नफा INR 801 कोटींपर्यंत नेट मजबूत कामगिरी केली, जो 59.4% ची वार्षिक वाढ दर्शवतो. RoA (0.8%), PPoP (INR1,358 कोटी) आणि NIM (2.5%) सारख्या प्रमुख निकषांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसल्या आहेत. मालमत्तेची गुणवत्ता स्थिर राहिली, CASA मध्येही योग्य वाढ दिसून आली आणि CET1 14.0% पर्यंत मजबूत झाला. मूडीज, ICRA आणि CARE कडून बँकेला क्रेडिट रेटिंग अपग्रेड देखील मिळाले ज्यामुळे तिची मूलभूत तत्त्वे मजबूत होतानाच वाढीला गती मिळाली. “

एसबीआय आणि इतर बँकांकडून सुमितोमो मित्सुई कॉर्पोरेशन बँकेने (एसएमबीसी) येसबँकमधील 20% इक्विटी हिस्सा खरेदी करण्यासाठी आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत करार केला. एसबीआय अजूनही यातील एक प्रमुख भागधारक आहे. व्हर्व्हेंटा होल्डिंग्ज लिमिटेडचे (अ‍ॅडव्हेंट इंटरनॅशनलच्या सहयोगी) नॉमिनी असलेल्या श्री. डी. शिवकुमार यांना येस बँकेने नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त केले. डायरेक्ट टॅक्स आणि कस्टम ड्युटी पेमेंट फॅसिलिटीसह येस बँक सक्रिय झाली. येस बँकेला 2025 (जुलै’25) मध्ये भारतातील सर्वोत्तम वर्कप्लेस™ आणि एप्रिल’25 मध्ये बीएफएसआय 2025 मध्ये भारतातील शीर्ष 50 सर्वोत्तम कार्यस्थळे™ म्हणून देखील मान्यता मिळाली आहे. एवढेच नाही तर डिजिटल पेमेंट्स पुरस्कार 2025 मध्ये माननीय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते बँकेला फसवणूक प्रतिबंध आणि तक्रार व्यवस्थापन श्रेणीमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार देखील मिळाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading