Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कृत्रिम बहुमतामुळे, भाजप ची सत्ता टिकवण्याचीच धडपड…! विरोधकांना साद घालण्याचेच् प्रयत्न..! काँग्रेस राज्य प्रवक्ते  गोपाळदादा तिवारी यांची टीका

पुणे दि १८ जुलै – केंद्रातील सत्तेच्या आघारे राजकीय घरफोड्या करत, मतांची चोरी करून, राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप प्रणीत महायुती सरकार ‘लोककल्याणकारी सत्तेची कर्तव्ये’ पार पाडण्यापेक्षा मिळालेली सत्ता टिकविण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहेत.
सत्ता टिकणार नाही, अशी भीती भाजपला असल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांना साद व साकडे घालण्याचे प्रकार सत्ताधारी पक्षाचे नेते सर्रास करत असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक चांगल्या गोष्टींवर, विधी मंडळ कामकाज, आदर्श परंपरा, किंवा संविधानिक मुल्यांवर बोलू शकले असते.
मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ज्या पद्धतीने सत्तेवर आले ते सत्ता व पद टिकविण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस हे ‘अनामिक भिती पोटी शिवसेना प्रमुख ऊध्दवजी ठाकरे सह विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाहीर साद व साकडे घालत असल्याचे’ स्पष्ट झाले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेले बहुमत हे अनैसर्गिक असुन, निवडणुक आयोगाच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रियेत काहीही होऊ शकते, या भितीने सत्ताधारी भाजपचे नेते ग्रासले असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘महायुती सरकार विरोधात’ जनतेने स्पष्टपणे मतदान केलेल्या पक्षाच्या नेत्यांनाच् अजुनही हावरटा प्रमाणे ‘जाहीर साद घालण्याच्या माकड चेष्टा’ करणे कोणत्या नैतिकतेत बसते..? असा सवाल ही प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
राज्यातील जनतेप्रती कर्तव्ये निभावण्याच्या राजधर्मास मात्र फडणवीस सरकार तिलांजली देत असल्याचे स्पष्ट होते.
राज्यातील ढासळलेली कायदा सुरक्षा, वाढत्या शेतकरी आत्महत्या, कामगार वर्गातील अशांतता, भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, राज्यावरील वाढते कर्ज, बिकट अर्थिक संकट व मित्र पक्षांमधील वाढता बेबनाव व अविश्वास या सर्व प्रकारच्या असुरक्षिततेच्या अनामिक भितीने भाजप ला ग्रासले आहे.
अद्यापही सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या व बेकायदेशीर निर्णयांवर कोंणीही प्रश्नच् उपस्थित करू नये या मानसिकतेने ग्रासल्यामुळेच सत्ताघाऱ्यांच्या भ्रष्टाचारात सहभागी होऊन, राज्याच्या लुटीत सामील होण्याची साद घालण्याचे केविलवाणे व अनैतिक प्रयत्न राज्यातील जनता स्पष्टपणे पहात आहे, अशी टीकाही काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading