Thursday, June 18, 2026

Month: June 2025

BusinessLatest News

तनिष्क डायमंड्सचे नवे ‘रेडियन्स इन रिदम’: नाजूक, नक्षीदार डिझाइन्स, आकर्षक आकार, उत्कृष्ट कला आणि १००% नैसर्गिक हिऱ्यांचे नवे कलेक्शन

भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड, टाटा परिवारातील एक सदस्य, तनिष्कने आपले नवे नैसर्गिक हिऱ्यांचे कलेक्शन प्रस्तुत केले आहे – ‘रेडियन्स इन रिदम’. कुशल हातांनी, अतिशय मनापासून, एकेक कहाणी गुंफत घडवलेले हे कलेक्शन आधुनिक महिलेपासून प्रेरित आहे, अशी महिला जी अनोखी आहे, आवडीनिवडीचा बाबतीत चोखंदळ आणि पारखी आहे व अगदी सहजपणे सर्वांच्या पुढे राहते. ‘रेडियन्स इन रिदम’ फक्त दागिने नाहीत तर, आधुनिक महिलेची आत्म अभिव्यक्ती आहे, जी अतिशय कलात्मक व शानदार पद्धतीने प्रस्तुत करण्यात आली आहे. दृढ विश्वास आणि सर्जनशील क्षमतांसह, वाटचाल करणाऱ्या महिलेसाठी डिझाईन करण्यात आलेले ‘रेडियन्स इन रिदम‘ कलेक्शन म्हणजे न घाबरता, न डगमगता स्वतःला अभिव्यक्त केल्याबद्दल स्तुती आहे. अशी महिला जेव्हा येते तेव्हा प्रत्येक क्षण आपलासा करते. व्यक्तिमत्त्वामध्ये सहज दिसून येणारी चमक, उत्तम अभिरुची आणि असामान्य गोष्टींविषयी आकर्षणाने सर्वांना प्रभावित करते. व्यक्तिमत्त्वातील या वैशिष्ट्यांनी या कलेक्शनला आकार दिला आहे. तनिष्क हिरे नाजूक डिझाइन्स आणि उत्कृष्ट कलाकौशल्यांच्या माध्यमातून तिच्या भावनांचा सन्मान करतात – हे दागिने तिची भाषा बोलतात – जी प्रभावी, आपलीशी वाटणारी आणि अविस्मरणीय आहे. आत्म–अभिव्यक्तीच्या या भावनेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेले ‘रेडियन्स इन रिदम’ कलेक्शन असामान्य हिरे आणि डिझाईन उत्कृष्टतेमुळे सर्वात अनोखे आहे. प्रत्येक दागिना कलाकौशल्यांचा मास्टरक्लास आहे, नैसर्गिक हिऱ्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेपासून विचारपूर्वक तयार केलेली डिझाइन्स आणि अनोख्या सेटिंग स्टाईलपर्यंत सर्व अनोखे आहे. कलेक्शनमध्ये प्रेशियस आणि सेमी–प्रेशियस स्टोन्सची एक शानदार श्रेणी आहे, यामध्ये पन्ना, सिट्रिन, एक्वामरीन, त्साओराइट, मॅलकाईट, तंजानाईट आणि अमेथिस्ट यांचा समावेश आहे, ज्यांना डिझाईननुसार नवनवीन पॅटर्न्समध्ये उपयोगात आणले गेले आहे. पावे, प्रोन्ग, चॅनेल, स्नो–पेव, बार आणि प्लेट प्रोन्ग सेटिंगसारख्या प्रमुख सेटिंग्स प्रत्येक स्टोनची चमक वाढवतात. निवडक डिझाइन्समध्ये फॅन्सी–कट हिऱ्यांचा उपयोग करण्यात आला आहे, त्यासोबत सुंदर मॉड्युलेशन त्यांना एक विशिष्ट चमक देतात. बंचिंग, ब्रीडिंग आणि कस्टम–कट स्टोन्स सारख्या कारीगर तंत्रांमुळे यांचे सौंदर्य अजून जास्त खुलले आहे. डिझाईन इनोव्हेशनमध्ये के साहसी पाऊल पुढे उचलत, तनिष्कने ‘रेडियन्स इन रिदम’ मध्ये आपल्या पहिल्या सिग्नेचर रत्न नक्षी – तनिष्क कट आणि द ओरिजिनल कट प्रस्तुत केल्या आहेत. हे प्रतिष्ठित कट तनिष्कची डिझाईन वाटचाल आणि रत्न कलात्मकतेप्रती सुधारित दृष्टिकोन यामध्ये विचारपूर्वक केला जात असलेला विकास दर्शवतात. सोन्याची प्रत्येक नक्षी आणि नैसर्गिक हिऱ्यांची चमक यांच्यासह ‘रेडियन्स इन रिदम’ महिलेच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्यांचा सन्मान करते. यामध्ये स्टेटमेंट नेकलेसच्या पुढे जाऊन, आधुनिक दागिन्यांचे विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कलेक्शन प्रस्तुत करण्यात आले आहे. झुमर झुमके आणि अंगठ्यांपासून, पेंडेंट सेट आणि बांगड्यांपर्यंत – प्रत्येक प्रसंग आणि स्टाईलला अनुरूप दागिने यामध्ये आहेत. तनिष्कचे नैसर्गिक हिरे या कलेक्शनचा केंद्रबिंदू आहेत, जे जगामध्ये सर्वात दुर्लभ आहेत. यामध्ये निवडले जाण्यासाठी आवश्यक असामान्य मानकांना फक्त ५% नैसर्गिक हिरेच पूर्ण करू शकतात. प्रत्येक हिऱ्याला त्याची चमक, शुद्धता आणि पूर्णत्व यासाठी निवडले जाते, त्यांची दोषरहित समरूपता आणि अचूक पैलू सुनिश्चित करण्यासाठी कमालीची सावधानी बाळगली जाते. हे हिरे अद्वितीय चमक प्रदान करतात, म्हणूनच त्यापासून तयार झालेला प्रत्येक दागिना उत्कृष्टता आणि कलेचा शानदार उत्सव बनतो.  कलेक्शनच्या शुभारंभाच्या प्रसंगी, चीफ डिझाईन ऑफिसर श्रीमती रेवती कांत म्हणाल्या, “रेडियन्स इन रिदमसोबत, आम्ही हिऱ्यांच्या डिझाईनच्या सीमांची नवी व्याख्या रचली जावी अशी आमची इच्छा होती – आमचे लक्ष्य एक असे कलेक्शन तयार करण्याचे होते जे प्रत्येकाला आपलेसे, स्वतःसाठी बनवलेले वाटावे, जे पूर्णपणे आधुनिक पद्धतीने तयार केलेले असावे. या कलेक्शनमधील प्रत्येक आभूषण आधुनिक महिलेच्या व्यक्तिमत्त्वातील चमक आणि प्रभावाचे प्रतिबिंब आहे. दुर्मिळ, नैसर्गिक हिरे हाताने निवडण्यात आले आहेत आणि प्रत्येक सेटिंग अचूकपणे डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये बोल्ड फॉर्म आणि एक्स्प्रेसिव्ह डिटेल्स यांना एकत्र जोडण्यात आले आहे. आकर्षक आकारांपासून कधी कोणी कल्पना देखील केली नसेल अशा जेमस्टोन पेयरिंग्सपर्यंत प्रत्येक घटकामागे एक विचार, एक भावना आहे. हे फक्त दागिने नाहीत तर स्वतःचा उत्सव आहे, ज्याला कलाकौशल्यांनी आकार दिला आहे आणि आत्मविश्वासाचा सन्मान करण्यासाठी तयार केले आहे.”

Read More
BusinessLatest News

सह्याद्रि रुग्णालयाच्या डेक्कन जिमखाना शाखेला इनॉक्सपा इंडियाकडून सीएसआर अनुदान

पुणे: पुण्यातील डेक्कन जिमखाना स्थित सह्याद्रि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा आता आणखी मजबूत झाल्या आहेत. इनॉक्सपा इंडिया या कंपनीने आपल्या सामाजिक

Read More
ENGLISH

Sanya Malhotra Steps Into Entrepreneurship With Her Signature Matcha Blend

  In an industry where pace often overpowers pause, Sanya Malhotra is choosing to lead differently. Known for her powerful

Read More
Latest NewsPUNE

रेल्वे मंत्रालय आणि बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी दिली शिवसृष्टीला भेट

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी सत्यात दाखविणारी शिवसृष्टी पाहण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच आंबेगाव बुद्रुक येथे

Read More
BusinessLatest News

टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे ऑल-इन वन इन्व्हेस्टमेंट ऍप भारताच्या गुंतवणूक करण्याच्या पद्धतीची नवी व्याख्या तयार करणार

टाटा ऍसेट मॅनेजमेंटने नवे मोबाईल ऍप लॉन्च केले आहे. हे अशा प्रकारचे पहिलेच ऍप असून यामध्ये युजर्सना त्यांच्या आर्थिक जगाचे सर्वसमावेशक चित्र पाहायला मिळेल. एक युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून डिझाईन करण्यात आलेले हे ऍप साधेपणा, बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक आवडीनिवडी गरजांनुसार बदल या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी – “एक ऍप. एक व्ह्यू. अमर्याद संधी” या ब्रँड प्लॅटफॉर्मखाली प्रस्तुत करते.  मोबाईल ऍपचे लॉन्च हे गुंतवणूक करणे अधिक जास्त सोपे, स्मार्ट आणि सहज उपलब्ध होण्याजोगे बनवण्यात एक मोठे पुढचे पाऊल आहे. “एक ऍप. एक व्ह्यू. अमर्याद संधी” या ब्रँड वचनासह हे ऍप गुंतवणूकदारांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करते – माहिती मिळवून, गुंतवणूक करण्यापासून ते आर्थिक उद्दिष्टांना ट्रॅक करण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी करता येते. या ब्रँड वचनाला अनुसरून, लॉन्च करण्यात आलेले नवे ऍप टाटा ऍसेट मॅनेजमेंटच्या डिजिटल परिवर्तनामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यावर्षी सुरुवातीला प्रकाशित करण्यात आलेली नवी ब्रँड ओळख आणि नवा लोगो व आता हे नवे ऍप आजच्या डिजिटल व गतिशील वातावरणामध्ये गुंतवणूकदारांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याची कंपनीची वचनबद्धता अधोरेखित करते. सेटिंग आणि उद्दिष्ट्ये ट्रॅकिंगसाठी फायनान्शियल रोडमॅप, म्युच्युअल फंड्स, इक्विटी आणि बँक खाती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी पोर्टफोलिओ ३६०, सेवानिवृत्ती लवकर घेण्यासाठी नियोजन करण्यासाठी फायर कॅल्क्युलेटर, इन्व्हेस्टमेंट निवडी सेव्ह करण्यासाठी स्मार्ट कार्ट आणि ऑनबोर्डिंगची सहजसोपी, सुरक्षित प्रक्रिया अशा वैशिष्ट्यांनी हे ऍप सुसज्ज आहे. गुंतवणूकदारांना प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आणि साहाय्य पुरवण्यासाठी यामध्ये लर्निंग मोड्यूल्स व चॅटबोट सपोर्ट देखील आहे.   टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे चीफ डिस्ट्रिब्युशन आणि डिजिटल ऑफिसर हेमंत कुमार यांनी सांगितले, “एक ऍप. एक व्ह्यू. अमर्याद संधी. ही केवळ एक टॅगलाईन नाही. आम्ही आमच्या ग्राहकांना जे देत आहोत त्याचा हा गाभा आहे. आजच्या गुंतवणूकदारांना एकच इंटेलिजंट प्लॅटफॉर्म हवा असतो जो त्यांना त्यांच्या सर्व आर्थिक संपत्तींबाबत सुस्पष्टता आणि नियंत्रण मिळवून देऊ शकतो. या ऍपमध्ये सर्वकाही एकाच ठिकाणी आहे – अखंडित ट्रॅकिंग, एक व्ह्यू पोर्टफोलिओ आणि वैयक्तिक अनुभव जो युजर्सना आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्यासाठी सक्षम बनवतो. हे ऍप नावीन्याप्रती आमची वचनबद्धता दर्शवते, संपत्ती निर्माण करणे अधिक सोपे, अधिक स्मार्ट आणि सहज उपलब्ध होण्याजोगे बनवते.” हे डिजिटल परिवर्तन आणि नवीन लुक यांच्यासह टाटा म्युच्युअल फंड नव्या युगातील गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करत, विश्वासाचा वारसा निर्माण करत आहे. ऍप स्टोर आणि गूगल प्लेवर हे नवे ऍप डाउनलोड करता येईल.  

Read More
ENGLISH

R. Madhavan & Fatima Sana Shaikh Come Together in a New Romcom ‘Aap Jaisa Koi’

The irresistible charm of R. Madhavan is set to win hearts in Netflix’s upcoming film Aap Jaisa Koi alongside Fatima

Read More
Latest NewsPUNE

मोदी सरकारने लघु उद्योजकांना तातडीने सबसिडी चालू करावी -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : ‘मेक इन इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’ अशी फसवी भाषा मोदी सरकारने बंद करावी आणि सुक्ष्म, मध्यम आणि लघु

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

श्रीमंत ‘दगडूशेठ’ गणपतीला माऊलींच्या  अश्वराजांची अनोखी मानवंदना 

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात

Read More
Latest NewsPUNE

सामाजिक उपक्रमांनी ‘नादब्रह्म’ चे वाद्यपूजन व सरावाचा श्रीगणेशा

पुणे : ताशाची तर्री आणि ढोलांचा निनाद हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तरुणाई एकत्र येत वाद्यवादनाचा सराव सुरू

Read More
Latest NewsPUNE

मुक्तांगण आणि नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ

Read More
Latest NewsPUNE

पुण्याच्या यजुर्वेंद्र महाजन यांची ‘गेल’चे संचालक म्हणून नियुक्ती

 पुणे : देशातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, आदिवासी व ग्रामीण तरुणांच्या निवासी उच्च शिक्षणासाठी दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल उपक्रमाच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण

Read More
ENGLISH

PNG Jewellers Taps into High-Growth Lightweight Jewellery Segment with New Brand ‘Litestyle’

Pune : PNG Jewellers, one of India’s most trusted jewellery houses with a legacy spanning over 192 years, proudly announced

Read More
BusinessLatest News

पुण्यातील अप्पर खराडी येथे गोदरेज प्रॉपर्टीजने सुमारे 16 एकर जमीन विकत घेतली

  खराडी-वाघोली पट्ट्यात या महिन्यातील कंपनीचे हे दुसरे भूसंपादन आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून एकत्रितरित्या INR 7,300 कोटींचा महसूल निर्माण होईल असा अंदाज

Read More
BusinessLatest News

एरिसइन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडचा ₹499.59 कोटींचा आयपीओ 18 जून रोजी सब्स्क्रिप्शनसाठी उघडणार

  ● प्रत्येक ₹2 फेस व्हॅल्यू असलेल्या इक्विटी शेअरसाठी प्राइस बँड ₹210 ते ₹222 इतका निश्चित करण्यात आला आहे. ●

Read More
Latest NewsPUNE

मनपा शाळा क्रमांक 162 बी व विद्यानिकेतन 19 चंद्रभागा नगर येथे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम उत्साहात व जल्लोषात साजरा

पुणे : चलो घंटी बजी स्कूल तुम्हे पुकारे ..या गाण्याच्या लयीत मनपा शाळा क्रमांक 162 बी व विद्यानिकेतन 19 चंद्रभागा

Read More
ENTERTAINMENTLatest News

मला शिवस्तुती पाठांतर करायला २ दिवस लागले  कारण… – विजया बाबर

झी मराठीवर लवकरच ‘कमळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कमळीच्या वायरल झालेल्या शिवस्तुतीच्या प्रोमोची चर्चा सर्वत्र होत आहे. पण कमळी म्हणजेच विजया बाबरने

Read More
ENGLISH

Medtronic to invest $50 million over 5 years in New Diabetes Global Capability Centre in Pune

Pune  :  Medtronic plc, a global leader in healthcare technology, has inaugurated a new Global Capability Centre (GCC) in Pune,

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

कुंडमळा पूल दुर्घटना प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करा;  रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मागणी

पुणे : जिल्ह्यातील कुंडमळा या ठिकाणी झालेल्या पूल दुर्घटना प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, यातील मृत्यूप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा

Read More
BusinessLatest News

रेनलिक्सकडून जगातील पहिले स्वदेशी एआय आधारित स्मार्ट हेमोडायलिसिस मशीन; मूत्रपिंड निगा यापुढे सुलभ आणि परवडणारी बनणार!

  पुणे : मूत्रपिंडासंबंधी आजारांच्या (रीनल केअर) क्षेत्रातील तंत्रज्ञान नवोन्मेषाने समर्थ अग्रेसर कंपनी, रेनलिक्स हेल्थ सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडने रिमोट मॉनिटरिंग

Read More
BusinessLatest News

अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून ‘हेल्थ इक्विटी फेलोशिप’ जाहीर

  पुणे : अझीम प्रेमजी फाउंडेशनने ‘अझीम प्रेमजी हेल्थ इक्विटी फेलोशिप’ जाहीर केली आहे. ही फेलोशिप १८ महिन्यांची असून, पदव्युत्तर

Read More