Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

मनपा शाळा क्रमांक 162 बी व विद्यानिकेतन 19 चंद्रभागा नगर येथे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम उत्साहात व जल्लोषात साजरा

पुणे : चलो घंटी बजी स्कूल तुम्हे पुकारे ..या गाण्याच्या लयीत मनपा शाळा क्रमांक 162 बी व विद्यानिकेतन 19 चंद्रभागा नगर येथे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला. 

विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार  भीमराव तापकीर, माजी नगसेवक योगिता भोसले,  युवराज बेलदरे,  शिक्षण संचालक माध्यमिक महेश पालकर,  जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी काळे, सहाय्य प्रशासकीय अधिकारी सुभाष सातव, विभागीय पर्यवेक्षिका पार्वती गोडे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेलदरे,  माननीय अरुण राजवाडे  व बहुसंख्या पालक वर्ग उपस्थित होते. 

ढोल ताशांच्या गजरात . विद्यार्थ्यांना औक्षण करून .स्वागत करण्यात आले .विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
इयत्ता पहिलीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कप व सुंदर क्राऊन देऊन पौष्टिक खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार भीमराव तापकिर यांनी शाळेचे कौतुक केले व शाळेबाबत काही भौतिक समस्या असल्यास त्या आमदारा निधीतून त्यांची पूर्तता करण्याबाबत संबोधित केले.
नगरसचि भोसले मॅडम यांनी शाळेतील विविध उपक्रमाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले .
तर संचालक डॉमहेश पालकर सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद सेवक वर्ग यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
सदर प्रसंगी .राज्यस्तरावर इयत्त पहिलीच्या प्रशिक्षण साठी निवड झालेल्या गायत्री शितोळे ( शिळीमकर) यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading