Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

संचय धनाचा मोठा की पुण्याचा? उत्तर देणार स्वामींची चमत्कृती!

कलर्स मराठीवर ४ मे रोजी पहायला मिळणार आहे जय जय स्वामी समर्थ मालिकेचा महाराविवार विशेष भाग. धनाने सर्व काही विकत घेता येतं का? संकटसमयी संपत्ती माणसाला तारू शकते का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना प्रेक्षक अनुभवणार आहेत एका आध्यात्मिक प्रवासाची कथा, जेथे एका श्रीमंत, गर्विष्ठ व्यापाऱ्याचा अहंकार स्वामी कसा तोडून काढणार आणि कसे उत्तर मिळणार हे पहायला मिळणार आहे. जेथे पुण्य आणि धन यांची खरी किंमत तपासली जाईल.

स्वामी समर्थांकडे एक भयभीत मंगलदास स्वामींच्या चरणी येतो. त्याचा चमत्कारिक मृत्यू झाला आहे आणि तो जीवनदानासाठी आर्जव करतो. स्वामी त्याला एक अट घालतात “संपत्तीचा त्याग करून गोरगरिबांसाठी वाटप कर.” तर दुसरीकडे, एक अलौकिक तराजू एका बाजूला शांत, स्थिर, तेजस्वी स्वामी बसलेले आणि दुसऱ्या बाजूला मंगलदास एकेक सोन्याच्या भांड्यांनी वजन भरत आहे. पण त्या संपत्तीचा भार स्वामींच्या तेजस्वित्वाशी मुळीच तोंड देऊ शकत नाही! गावकरी अवाक होऊन हे दृश्य पाहत असतात. आणि अखेर त्याची संपत्ती संपते. पण पुण्य संपत नाही.

मंगलदासाच्या मनात परिवर्तन होतं. स्वामींचे शब्द मनात घर करतात: “आयुष्यभर ज्या धनाच्या पाठीमागे धावलास ते तुला वाचवू शकले नाहीं, तेव्हा पुण्य कमाव.”हा केवळ एक अध्यात्मिक संदेश नाही, तर जीवनातल्या खऱ्या मूल्यांची जाणीव करून देणारा प्रसंग आहे. म्हटले तर साधी सरळ वाटणारी गोष्ट आहे, मात्र मंगलदासचा चमत्कारिक मृत्यू झालेला आहे, त्याला जीवनदान खरेच मिळते का , ही अजब स्वामी लीला कशी घडते. पुढे अजून काय बघायला मिळेल हे जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ ४ मे महारविवार विशेष भाग जय जय स्वामी समर्थ दुपारी २ आणि रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading