Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

भुंगासुराचे मायावी संकट आई तुळजाभवानी कसे परतवणार ?

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिका देवी अध्यायातल्या अत्यंत रंजक टप्प्यावर आहे. महिषासुराने तुळजा पत्नी म्हणून हवी आहे आणि त्या कार्यात तू मदत कर अशी मागणी पत्नी शुंभाकडे केली होती. यामुळे मत्सराने पेटलेल्या शुंभाने तुळजाचा अंत करण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी भुंगासुराची मदत घेतली आहे. महिषासुराच्या न कळवत शुंभा चिंचपुरात दाखल झाली असून मानवी रक्त शोषणारे असंख्य भुंगे देवीच्या भक्तांवर सोडून देवीला त्यात गुंगवून, गाफील ठेवून पार्वतीच्या या अवतराला संपवून टाकण्याची तिची योजना आहे. यात ती सफल होणार का ? हे असुरी मायावी आव्हान आई तुळजाभवानी कसे परतवणार ? याचा अत्यंत नाट्यमय खिळवून टाकणारा कथाभाग येत्या रविवारी होणाऱ्या महाएपिसोडमध्ये घडणार आहे. पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पहा आई तुळजाभवानी मालिकेचा महाराविवार विशेष भाग ४ मे दु १ आणि संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading