राष्ट्रीय: लग्न म्हणजे जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात! भविष्य निर्माण करण्यासाठी नाती, मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यांची सुरेख गुंफण घालून, एकत्र येणे म्हणजे लग्न! आजच्या काळात लग्नांना अजून जास्त अर्थ प्राप्त झाला आहे, आजच्या काळातील लग्न म्हणजे एकमेकांच्या वैयक्तिक आवडीनिवडी, सवयी स्वीकारणे, एकमेकांना पाठिंबा देत आयुष्यात उत्कर्ष साधण्याला प्रोत्साहन देणारे नाते म्हणजे लग्न. भारतात सर्वात जास्त विकला जाणारा, टायटन परिवारातील वॉच ब्रँड, सोनाटाने लग्नाच्या या नव्या व्याख्येला चपखल बसेल अशी ‘ड्रीम टुगेदर’ थीम घेऊन आपले नवे वेडिंग कलेक्शन प्रस्तुत केले आहे. वेडिंग वॉचेससाठी सर्वोत्तम ब्रँड ही सोनाटाची ओळख अधिकच दृढ झाली आहे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचे मिलन नव्हे तर, लग्न म्हणजे नव्या अध्यायाची सुरुवात, एकमेकांची स्वप्ने, इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटण्याचा आणि जीवनभर सोबत राहतील अशा अनुभवांचा प्रवास सुरु करणे म्हणजे लग्न. जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्याचा आधुनिक जोडप्यांना अभिप्रेत असलेला अर्थ ‘ड्रीम टुगेदर‘ मध्ये सामावला आहे: परंपरा आणि आधुनिकतेचा, वचने आणि विश्वासाचा मिलाप. नाती जपत असताना देखील स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन, एकत्र मिळून भविष्य निर्माण करण्याची आस मनात असणाऱ्यांसाठी, सारासार विचार करून अतिशय आत्मविश्वासाने नवे पाऊल उचलत असलेल्यांसाठी ‘आयडियल कम्पॅनियन‘ ही सोनाटाची ओळख या नवीन वेडिंग कलेक्शनने अधिक दृढ केली आहे. आपल्या जीवनातील सर्वात खास दिवशी एक संस्मरणीय प्रभाव निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुण जोडप्यांच्या भावना सोनाटाच्या नवीन वेडिंग कलेक्शनमध्ये दिसून येतात. परंपरा आणि आधुनिक युगातील डिझाईन यांचा मिलाप असलेल्या या कलेक्शनमध्ये सुबक, सुंदर, सुस्पष्ट सिल्हउट्स आणि प्रत्येक बारकाव्यातही जपली गेलेली कला व ठळक उठून दिसणारे असेंट्स आहेत. आधुनिक सोफिस्टिकेशन, चमक आणि भरपूर ग्लॅमर असलेली डिझाइन्स असलेली सोनाटाची वेडिंग रेन्ज फक्त एक स्टेटमेंट पीस किंवा विचारपूर्वक दिलेले गिफ्ट नाही तर, ते घालणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षांचे प्रतिबिंब आहे. पारंपरिक पेहराव असो आधुनिक लूक असो, सोनाटाच्या वेडिंग कलेक्शनमधील घड्याळे प्रत्येक लग्न सोहळ्याला उत्कृष्ट शैली आणि नवा आत्मविश्वास प्रदान करून शानदार बनवतील. प्रत्येक नवी सुरुवात अतिशय उत्साहाने आणि उमेदीने स्वीकारणाऱ्या आजच्या आधुनिक पिढीच्या भावना सोनाटाने पुरेपूर दर्शवल्या आहेत. गिफ्ट म्हणून असो किंवा स्वतःविषयी प्रेम म्हणून असो, ही घड्याळे नवरा–नवरी, त्यांचे भाऊ–बहीण, अगदी जवळचे मित्र–मैत्रिणी आणि प्रियजनांसाठी अगदी योग्य आहेत. लग्नाचा सोहळा खऱ्या अर्थाने सार्थक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही घड्याळे बनवण्यात आली आहेत. या लॉन्चविषयी सोनाटाचे मार्केटिंग हेड श्री प्रतीक गुप्ता म्हणाले, “आजचे महत्त्वाकांक्षी तरुण तरुणी वचनांच्या बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घेतात कारण त्यांना वाटते की, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक विकासात अडचणी येऊ शकतील. पण वास्तविक पाहता, पार्टनरशिप तुमच्या स्वप्नांना पंख देतात, त्यांच्या आड येत नाहीत. सोनाटामध्ये आम्ही मानतो की, लग्न हे दोन भविष्यांची सांगड घालण्याचे प्रतीक आहे. ‘ड्रीम टुगेदर‘ ही आमची थीम वैयक्तिक वेळेपेक्षा एकत्र मिळून व्यतीत केलेल्या वेळेची परिवर्तनात्मक शक्ती दर्शवते, ही थीम दोन व्यक्तींच्या सिनर्जीचा आनंद साजरा करते, अशा दोन व्यक्ती ज्या एकत्र येऊन एकमेकांच्या उद्दिष्टांना बळ देतात.” सोनाटा वेडिंग कलेक्शनमधील घड्याळांच्या किमती २४९५ रुपयांपासून पुढे आहेत. टायटन वर्ल्ड आउटलेट्स किंवा ऑनलाईन www.sonatawatches.in वर ही घड्याळे खरेदी करता येतील. जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात स्टाईलने करा, तुमचा आनंद सोनाटासोबत साजरा करा.
Read More