Saturday, May 30, 2026
Latest NewsSports

गौरव कनोजिया, प्रतिक भडाळे, जयराज सोनी, अ‍ॅलेक्स् रेगो यांनी पहिला दिवस गाजवला !!

पुणे :  पुणे जिल्हा बिलीयडर्स आणि स्नुकर संघटना (पीडीबीएसए) यांच्या मान्येतेखाली आणि क्यु कल्चर क्लब आणि अ‍ॅपेक्स् स्पोटर्स तर्फे आयोजित ‘द क्यु कल्चर करंडक’ खुली ९-बॉल पुल अजिंक्यपद स्पर्धेत गौरव कनोजिया, प्रतिक भडाळे, जयराज सोनी आणि अ‍ॅलेक्स् रेगो यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पहिला दिवस गाजवला.

वानवडी येथील द क्यु कल्चर क्लब येथे ही स्पर्धा आजपासून सुरू झाली. या स्पर्धेत एकूण ६४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा बिलीयर्डस् आणि स्नुकर संघटना यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पहिल्या बाद फेरीमध्ये क्यु कल्चरच्या गौरव कनोजिया याने विल्बोर फ्रान्सीस याचा ७-५ असा पराभव केला. स्नुकर क्लबच्या प्रतिक भडाळे याने मधुर कपूर याचा ७-६ असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. जयराज सोनी याने मोहम्मद अजदार आणि अलेक्स् रेगो याने जयराज सोनी याचा ७-३ अशा सारख्याच फरकाने पराभव केला आणि दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा निकालः पहिली बाद फेरीः
गौरव कनोजिया (क्यु कल्चर) वि.वि. विल्बोर फ्रान्सीस (क्यु क्लब) ७-५;
प्रतिक भडाळे (स्नुकर क्लब) वि.वि. मधुर कपूर (क्यु कल्चर) ७-६;
जयराज सोनी (ब्रेक द स्नुक) वि.वि. मोहम्मद अजदार (क्यु कल्चर) ७-३;
अलेक्स् रेगो (क्यु क्लब) वि.वि. जयराज सोनी (ब्रेक द स्नुक) ७-३;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading