Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

स्पाईस मनीने मार्च 2025 मध्ये ग्राहक GTV मध्ये 11,485 कोटी रु. चा टप्पा पार करत प्रस्थापित केला नवा विकास मापदंड

नवी दिल्ली :  भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी आणि देशातील सर्वात मोठे नॉन-बँक बिझनेस करस्पाँडन्ट (BC) नेटवर्क असलेल्या स्पाईस मनी (DiGiSPICE Technologies ची उपकंपनी) ने मार्च 2025 मध्ये विविध सेवा क्षेत्रांमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक वाढीचा टप्पा नोंदवला. या कामगिरीतून कंपनीची या क्षेत्रातील आघाडीची भूमिका अधोरेखित होते आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील आर्थिक समावेशनासाठी असलेली त्यांची बांधिलकी अधिक मजबूत होते.

कंपनीने ऑक्टोबर 2024 मध्ये नोंदवलेल्या 11,387 कोटी रु. च्या मागील उच्चांकावर मात करत 11,485 कोटी रु. चा विक्रमी ग्राहक GTV नोंदवला. या वृद्धीला आधार प्रणीत पेमेंट सिस्टिम  (AePS) व्यवहारांतील मोठ्या प्रमाणातील वाढीमुळे पाठबळ मिळाले आणि ते 5,306 कोटी रु. वर पोहोचले. या कामगिरीमुळे स्पाईस मनीचा AePS बाजारपेठीय हिस्सा 18.3% वर पोहोचला. त्यामुळे ग्रामीण भारतातील समावेशक बँकिंग क्षेत्रात कंपनीचे नेतृत्व अधिक मजबूत झाले.

AePS वापरामध्ये झालेली ही अभूतपूर्व वाढ आतापर्यंत विक्री झालेल्या 70,000 हून अधिक सबस्क्रिप्शन पॅक्समुळे अधिक गतिशील झाली. हे केवळ अधिकाऱ्यांमधील वाढती मागणी दर्शवत नाही, तर ग्रामीण ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये या सेवांचा अधिकाधिक एकत्रित वापर होत असल्याचेही दर्शवते. या पॅक्सचा स्वीकार थेट व्यवहारांच्या संख्येत वाढीला कारणीभूत ठरला असून संपूर्ण परिसंस्थेमध्ये एक मजबूत नेटवर्क परिणाम निर्माण करत समुदाय-आधारित बँकिंगसाठी विश्वास, सोय आणि सुविधा यांचे एकत्रीकरण करत आहे.

जोडीला कंपनीच्या कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CMS) ने देखील जोरदार कामगिरी केली असून त्यात केवळ 1 महिन्यात 2,000 कोटी रु. वरून 4,000 कोटी रु. पर्यंत दुप्पट वाढ झाली. ही वृद्धी निमशहरी व ग्रामीण भागांमध्ये सुरक्षित आणि कार्यक्षम रोख व्यवस्थापनासाठी स्पाईस मनीच्या पायाभूत सुविधांचा वाढता स्वीकार दर्शवते.

या कार्यात्मक गतीला चालना देणारा मुख्य घटक म्हणजे स्पाईस मनी चे 15 लाखांहून अधिक अधिकारी/व्यापाऱ्यांचे नेटवर्क. हे अंतिम टप्प्यापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवण्याचे काम करत आहे. या नेटवर्कमधून ग्रामीण समुदायांमध्ये स्थानिक स्पाईस मनी प्रतिनिधींवर असलेला विश्वास दिसून येतो.

या उल्लेखनीय वाढीबद्दल बोलताना स्पाईस मनी चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मोदी म्हणाले, “ही वाढ आमच्यासाठी केवळ व्यवसायातील मैलाचा दगड नाही, तर ग्रामीण भारतात निर्माण होत असलेल्या आर्थिक आत्मविश्वासाचे द्योतक आहे. तसेच विकसित भारत या राष्ट्राच्या दृष्टिकोनासाठी आमची खोल बांधिलकी यातून दिसून येते. सध्या नॉन-बँक BC मॉडेलच्या संबंधित नियामक चौकटीत मोठे बदल सुरू आहेत. अशा वेळी आमची कामगिरी डिजिटल दृष्ट्‍या सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत उभारण्यात आमच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अधिक बळकट करते. स्पाईस मनी मध्ये आम्ही केवळ आर्थिक उत्पादने तयार करत नाही, तर भविष्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची पायाभरणी करत आहोत.

देशाच्या कानाकोपऱ्यातील विश्वासार्ह अधिकाऱ्यांद्वारे आम्ही भारताची खरी क्षमता उलगडण्याचे काम करत आहोत आणि भारताच्या 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासाला आर्थिक परिवर्तनाच्या माध्यमातून बळ देत आहोत.”

नॉन-बँक BC इकोसिस्टमवरील नियमनासंबंधी चर्चांना वेग येत असताना स्पाईस मनी ची ही यशोगाथा सर्वसमावेशक आणि इंट्राऑपरेबल वित्तीय नेटवर्क्स काय घडवू शकतात हे दाखवून देते.  प्रत्येक व्यवहारासोबत कंपनी आर्थिक दरी कमी करत आहे, बँकिंग सुविधा देशातील वंचित लोकांच्या दारापर्यंत पोहोचवत आहे आणि खरा आर्थिक सहभाग घडवून आणत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading