गोदरेज प्रॉपर्टीजने तिमाही आणि पूर्ण वर्षासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक बुकिंग केले
मुंबई : आघाडीची राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (GPL) (स्क्रिप्ट आयडी: GODREJPROP) तिमाही आणि पूर्ण वर्षातील आतापर्यंतचे सर्वोच्च बुकिंग केल्याचे जाहीर केले आहे.
o गोदरेज प्रॉपर्टीजने तिमाही आणि पूर्ण वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक बुकिंग केले.
o आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत गेल्या तिमाहीच्या तुलनेत बुकिंग मूल्य 87% आणि वार्षिक 7% नी वाढून 10,163 कोटी रुपये झाले. एकूण 7.52 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या 3, 703 घरांच्या विक्रीद्वारे हे शक्य झाले. गोदरेज प्रॉपर्टीजने मिळवलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक तिमाही बुकिंग मूल्य आहे.
o जीपीएलने 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बुकिंग मूल्य दिल्याची ही सलग 7 वी तिमाही आहे.
o आर्थिक वर्ष 2025 च्या बुकिंग मूल्यात वार्षिक 31% नी वाढ होऊन ते 29,444 कोटी रुपये झाले. एकूण 25.37 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या 15,302 घरांच्या विक्रीद्वारे हे साध्य झाले, म्हणजेच वार्षिक वाढ 29%. भारतात आजघडीला कोणत्याही रिअल इस्टेट डेव्हलपरने जाहीर केलेले हे आतापर्यंतचे सर्वोच्च बुकिंग मूल्य आणि व्हॉल्यूम आहे.
o आर्थिक वर्ष 25 च्या बुकिंग मूल्यासाठी जीपीएलने वार्षिक मार्गदर्शनाच्या १०९% साध्य केले आहे.
o आर्थिक वर्ष 25 हे जीपीएलसाठी बुकिंग मूल्य वाढीचे सलग आठवे आर्थिक वर्ष होते.
o अनेक प्रमुख नवीन प्रकल्पांचे लॉन्चिंग, त्याला मजबूत मागणी यामुळे आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत चांगलीच वाढ झाली. यात नोएडामधील गोदरेज रिव्हराइन, ज्याने 20000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बुकिंग मूल्य गाठले, गुरुग्राममधील गोदरेज अॅस्ट्रा, ज्याने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बुकिंग मूल्य गाठले आणि हैदराबादमधील गोदरेज मॅडिसन अव्हेन्यू, ज्याने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बुकिंग मूल्य गाठले, याचा समावेश आहे.
o आर्थिक वर्ष 25 मध्ये बुकिंग मूल्यात एनसीआर, एमएमआर आणि बेंगळुरू यांनी अनुक्रमे 10,500 कोटी रुपये, 8,000 कोटी रुपये आणि 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले.
गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत पहिल्यांदाच विक्री बुकिंगमध्ये 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचा आम्हाला आनंद आहे. गेल्या 3 वर्षात आमच्या विक्री बुकिंगमध्ये एकत्रितरित्या 55% वार्षिक वाढ राहिली आहे. याद्वारे, जीपीएलने त्यांच्या कामकाजाची पद्धती ठरवली आहे. आणि बुकिंग मूल्याच्या बाबतीत सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट डेव्हलपर ठरला आहे. गोदरेज प्रॉपर्टीज बद्दल त्यांना असलेली आस्था आणि त्यांच्या विश्वासाबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे तसेच सर्व भागधारकांचे मनापासून आभार मानतो.
आर्थिक वर्ष 25 मध्ये 26,450 कोटी रुपयांच्या भविष्यातील बुकिंग मूल्यासह आमच्या व्यवसाय वाढीमुळे पुढील वर्षांत आमची लाँचिंग पाइपलाइन मजबूत राहील याची खात्री आहे. शिवाय, डिसेंबर 2024 मध्ये आम्ही QIP द्वारे उभारलेले 6,000 कोटी रुपयांचे इक्विटी भांडवल आणि आर्थिक वर्ष 25 मध्ये आम्ही निर्माण केलेल्या विक्रमी ऑपरेटिंग कॅश फ्लोमुळे आम्हाला विस्तारासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवता येईल. भारतातील प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये आम्ही आमचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. आणि पुढील काही वर्षांमध्ये सर्व प्रमुख ऑपरेटिंग मेट्रिक्समध्ये शाश्वत उच्च-गुणवत्तेची कामगिरी करण्याची आमची इच्छा आहे.
