एचडीएफसी सिक्युरिटीज तर्फे एचडीएफसी स्काय वर प्रगत F&O डॅशबोर्ड सादर
मुंबई : एचडीएफसी सिक्युरिटीजने आज आपल्या डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म एचडीएफसी स्कायवर फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) डॅशबोर्ड सादर करत असल्याचे जाहीर केले. हे नवीन फिचर गुंतवणूकदारांना प्रगत साधने आणि अंमलबजावणी विषयक माहिती देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. त्यायोगे डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये अधिक माहितीपूर्ण निर्णय घेणे शक्य होईल. F&O डॅशबोर्डमध्ये अत्याधुनिक अॅनालिटिक्स आणि वन-क्लिक एक्झिक्युशन क्षमता एकत्रित करण्यात आल्या असून नवोदित तसेच अनुभवी गुंतवणूकदारांना सेवा पुरवित आहेत.
“एचडीएफसी सिक्युरिटीज मध्ये आमचा दृष्टिकोन तंत्रज्ञान प्रणीत उपायसुविधांद्वारे वित्तीय बाजारपेठ लोकांसाठी खुली करणे हाच आहे,” असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धीरज रेली यांनी सांगितले. “नवीन F&O डॅशबोर्ड हे पूर्वी केवळ व्यावसायिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेली संस्थात्मक दर्जाची साधने भारतीय गुंतवणूकदारांना देऊन त्यांना सक्षम करण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रगत अॅनालिटिक्स आणि सहज इंटरफेस यांचा संगम करून आम्ही ग्राहकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि गुंतगुंतीची धोरणे आत्मविश्वासाने अंमलात आणण्यास सक्षम करत आहोत.”
नवीन F&O डॅशबोर्ड अनेक शक्तिशाली साधनांसह सुसज्ज आहे. त्यात ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टचे सखोल विश्लेषण करण्यासाठी स्मार्ट ऑप्शन चेन आहे. त्यामध्ये ओपन इंटरेस्ट बार, हायेस्ट ओपन इंटरेस्ट, वॉल्यूम आणि इम्प्लाईड व्होलॅटीलिटीसाठी प्रगत फिल्टर्स आहेत. तसेच सविस्तर Greeks विश्लेषणही आहे. स्मार्ट फ्यूचर चेन सर्व उपलब्ध फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्सचे बिल्डअप डेटा सह एकत्रित दृश्य देते, तर FII/DII Activity Tracker कॅश आणि डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट्समधील संस्थात्मक खरेदी-विक्री प्रवाहाबाबत माहिती देते.
ट्रेडर्स Basket Order फिचरचा वापर करून मल्टिलेग स्ट्रॅटेजीज एका क्लिकमध्ये अंमलात आणू शकतात, तसेच मार्केट व्ह्यूवर आधारित pre-built व्यवहारासाठी Quick Options वापरू शकतात.
इतर वैशिष्ट्यांमध्ये ट्रेड विथ हीटमॅप हे विविध क्षेत्रांमध्ये बाजार विस्ताराचे दृश्य चित्र, सर्वाधिक अॅक्टिव्ह स्टॉक फ्युचर्स आणि ऑप्शन्स रिअल-टाइममध्ये ओळखून देणारे मार्केट मुव्हर्स अँड स्कॅनर्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. प्रगत F&O डॅशबोर्ड गुंतवणूकदारांना तज्ज्ञ व्यावसायिकांच्या शिफारसींसाठी अॅक्सेस मिळवून देते तर फोरकास्ट व्ह्यू अँड लेव्हल ऑप्शन धोरण वापरकर्त्यांच्या ठरवलेल्या युजर परिभाषित व्ह्यू किंवा प्राइस लेव्हल्सनुसार तयार केलेली धोरणे पुरवते.
F&O डॅशबोर्ड गुंतवणूकदारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण फायदे पुरवितो. त्यात प्रगत बाजारपेठीय विश्लेषण, वन-क्लिक मल्टिलेग स्ट्रॅटेजी अंमलबजावणीद्वारे वेळेची बचत, निर्देशांक, ऑप्शन्स आणि फ्युचर्समध्ये सर्वसमावेशक कव्हरेज, प्रगत फिल्टर्स आणि अॅनालिटिक्सद्वारे गुंतवणुकीची अचूकता वाढवणे आणि रिअल-टाइम माहिती मिळवणे यांचा समावेश आहे.
या रिलीज मधून एचडीएफसी सिक्युरिटीज मधील विविध टीम्सचा सामूहिक प्रयत्न दिसून येतो. त्यात उत्पादन, UI/UX, इंजिनीअरिंग आणि QA, मार्केटिंग आणि डिजिटल रेव्हेन्यू टीम्सचा समावेश आहे. विकास प्रक्रियेमध्ये विस्तृत संशोधन, डिझाइन सुधारणा आणि कठोर चाचण्या यांचा समावेश होता. त्यातून एक अखंड आणि मूळ उपयोगकर्ता अनुभव सुनिश्चित केला जातो. आणि ट्रेडर्सच्या निर्णय प्रक्रियेमध्ये बहुमोल मूल्याची भर पडते.
एचडीएफसी स्काय डिस्काउंट ब्रोकिंग क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्णता आणत आहे आणि F&O डॅशबोर्ड हे गुंतवणूकदारांना वित्तीय बाजारपेठेतील मार्गक्रमणासाठी उत्कृष्ट साधने देण्याच्या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड आहे. कंपनी भारताच्या वाढत्या गुंतवणूकदार समुदायाच्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या डिजिटल योजना सुधारण्यास कटिबद्ध आहे
