ब्लॉकबस्टर यशानंतर ‘छावा’ आता पहा ‘या’ OTT वर
ऐतिहासिक कथानकावर आधारित आणि भव्य दिव्य शैलीत सादर करण्यात आलेला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये भरघोस यश मिळवून आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅडॉक फिल्म्स निर्मित आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
या चित्रपटात विक्की कौशल यांनी भारतातील महान योद्धा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेरणादायी आणि शौर्याने भरलेले जीवन या चित्रपटात अत्यंत प्रभावी आणि भव्यतेने मांडण्यात आले आहे.
‘छावा’ हा चित्रपट इतिहासप्रेमींना आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
