Sunday, September 13, 2026
Latest NewsPUNE

भगवान वराह जयंतीनिमित्त पुण्यात रविवारी भव्य मिरवणूक

पुणे : श्री भगवान वराह जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज, पुणे यांच्या वतीने १३ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यात धार्मिक व सामाजिक उत्साहात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीची सुरुवात सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. कस्तुरे चौक ते श्री बालाजी मंदिर, भवानी पेठ असा मिरवणुकीचा मार्ग आहे. अशी माहिती सामाजिक व राजकीय विश्लेषक सर्वेश मेहेंदळे आणि युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भगवान विष्णूंच्या वराह अवताराची कथा पृथ्वीच्या संरक्षणाशी जोडली जाते. हिरण्याक्षाने पृथ्वीला समुद्रात लपविल्यानंतर भगवान विष्णूंनी वराह रूप धारण करून पृथ्वीचे रक्षण केल्याचे पौराणिक कथेत सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर वराह जयंतीच्या माध्यमातून पृथ्वी संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि भूमीच्या महत्त्वाचा संदेश देण्यात येत आहे.

सध्याच्या काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीसमोर निर्माण झालेल्या संकटाकडेही या सोहळ्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. पृथ्वीचे संरक्षण करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य असून भूमीचे संवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading