Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

कलर्स मराठीवर रंगणार एका तासाचे मकर संक्रात विशेष भाग !

मकरसंक्रांत हा सण महाराष्ट्रात अतिशय उत्साह, आनंदामध्ये साजरा केला जातो. मकर संक्रात म्हंटलं कि, पहिली गोष्ट आठवते ती तीळगुळाचे लाडू, तिळाच्या वड्या आणि हलवा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांना हे तीळगुळाचे लाडू खूप आवडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पतंग उडवणे. कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेमं दिले. मालिकेमधील सरकार आणि सानिकाची जोडी, त्यांच्यातील मैत्री, भांडण, कडू – गोड आठवणी, त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास याचे प्रेक्षक साक्षी आहेत. सरकार – सानिकाने नेहेमीच त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना खंबीरपणे उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे पिंगा गं पोरी पिंगा मालिकेतील पाच जणींची मैत्री, त्यांच्यावर येणारी संकंट, त्यांचं नातं त्यांच्यातील भांडणं हेदेखील बघायला प्रेक्षकांना आवडत आहे. कलर्स मराठीवर रंगणार एका तासाचे मकर संक्रात विशेष भाग. १२ जानेवारी रोजी # लय आवडतेस तू मला दु. १ वा संध्या ७.०० वा आणि पिंगा गं पोरी पिंगा दु. २ वा. आणि रात्री ८.०० आपल्या कलर्स मराठीवर.

# लय आवडतेस तू मला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. सानिकाने आपल्या प्रेमाची कबुली दिली असून तिला कुठेतरी वाटते आहे राजा म्हणजेच सरकारने देखील त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे काबूल करावे. पण, सरकारची काही कारण आहेत त्यामुळे तो करू शकत नाहीये. यातच सर्वेश – सानिकाचा साखरपुडा होणार आहे. पण, आता सरकार – सानिकाच्या प्रेमावर पंकजा संक्रांत आणणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सरकारने सानिकासाठी लिहिलेली चिठ्ठी ती बदलताना दिसते आहे. येत्या १२ जानेवारीच्या विशेष भागामध्ये सरकार सानिकाला सत्य सांगायचे ठरवतो. तो कळशी गावचा असून अप्पासाहेबांचा मुलगा आहे. हे सत्य सांगितल्यावर त्याचे काय परिणाम होतील ? सानिका कुठलं पाऊल उचलेल हे नक्की बघा. यासोबतच मालिकेत संक्रांत विशेष भागामध्ये पतंग उडविण्याची स्पर्धा रंगणार आहे ज्यामध्ये सानिकाच्या टीममध्ये सरकार आणि सर्वेशच्या टीममध्ये पंकजा असणार आहे. या पतंग उडविण्याची स्पर्धेत आणि नात्यांच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार हे बघणे उत्सुकेतचे असणार आहे.

पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत पिंगा गर्ल्सचा बिल्डर विरोधात लढा बघायला मिळणार आहे. बुलबुल बॅग वाचवण्यासाठी पाचची जणी मैदानात उतरणार आहेत. बिल्डर वल्लरीला पैसे देतो. पण, तिला कळतं नाही असं त्याने का केले असेल बरे. वल्लरीला त्याचे उत्तर कळते, आणि ते ती पिंगा गर्ल्सना सांगते. आपल्यात फूट पडली आहे जे त्याला कळले आहे आणि त्याचाच फायदा त्याने घेतला आहे. यानंतर बिल्डर पिंगा गर्ल्स ना धमकी देतो कि दोन दिवसात रस्त्यावर आणणार मग ते म्हतारे असो वा तरुण सगळे बाहेर येणार. पण, वल्लरी मात्र निडरपणे त्याला तोंड देते आणि त्याला रस्ता दाखवताना दिसली आहे. आता वल्लरी सर्व शेजारीना प्रेरित करते आणि गत्यांची मदत घेते.. आता वल्लरी कसा उलट गेम खेळणार ? कशी त्या बिल्डरला उत्तर देणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेव्हा नक्की बघा कलर्स मराठीवर रंगणार एका तासाचे मकर संक्रात विशेष भाग. १२ जानेवारी रोजी # लय आवडतेस तू मला दु. १ वा संध्या ७.०० वा आणि पिंगा गं पोरी पिंगा दु. २ वा. आणि रात्री ८.०० आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading