Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झाली आहे अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग !

महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ यांना अनेक वर्षांनी छोट्या पडद्याने खुणावलं, ते ‘कलर्स मराठी’वर सुरु असलेल्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेने. एक वेगळा विषय, उत्तम कलाकारांचा संच, उत्कृष्ट लेखन आणि अर्थातच अशोकमामा यामुळे मालिका सुरु होताच प्रेक्षकांची पसंती त्याला मिळाली. मालिकेतील इतर महत्वाचे कलाकार रसिका वाखारकर, नेहा शितोळे, आणि बच्चे कंपनी यांनी देखील आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली. रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मा. मा. च्या एकाकी आयुष्यात आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य ढवळून निघालं. मुलाच्या आणि सुनेच्या अकाली मृत्युंनतर आता नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. आणि यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भैरवी. आता मा. मा. या नातवंडांचे हट्ट, लाड कसे पुरवणार ? कशी त्यांना शिस्त लावणार ? हे पाहण उत्सुकतेच असणार आहे. थोडक्यात नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झाली आहे अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग ! तेव्हा नक्की बघा अशोक मा.मा. दररोज रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

मालिकेमध्ये येत्या आठवड्यात अशोक मा.मा. आणि मुलांचे बदलेले नाते व बदलत जाणारं नातं, त्यांच्या नात्यातील कंगोरे आणि मामांची एक वेगळीच बाजू बघायला मिळणार आहे. एकीकडे त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आणि त्यासाठी आजच्या काळाशी जुळवून घेण्यासाठी मामांचे प्रयत्न, जॉब मिळविण्याची सुरु असलेली धडपड आणि दुसरीकडे मामांचे नातवंडांसह नातं बघायला मज्जा येणार आहे. इरा म्हणजेच निया पवार म्हणाली, “अशोक मामांसोबत काम करायला मिळणे हे तर माझं भाग्य आहे. मामांकडून रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अशोक मा.मा. ह्या मालिकेत अशोक मामा हे माझे आजोबा आहेत आणि आम्हा तिन्ही भावंडांमध्ये मी त्यांची लाडकी नात आहे. खऱ्या आयुष्यात मी कधीच आजोबांचं प्रेम अनुभवलं नव्हतं पण अशोक मा.मा. निमित्ताने आजोबांचं प्रेम अनुभवयला मिळालं ते ही अशोक मामा हे आजोबा हे मी माझं भाग्य समजते. आणि आता सुरू असलेल्या सेकंड इनिंग मध्ये आजोबा आणि इराचं नातं आणखीनच समजूतदार झालंय त्यांच्या मनातल्या गोष्टी ती सहजच ओळखू लागली आहे. त्यांची आमच्यासाठी चालू असलेली धडपड तिला समजतेय. खूप वेळा आजोबांसोबत सीन करताना सीन छान झाला की ते डोक्यावरती हात ठेवून बोलतात “पिल्लू खूप छान सीन केलास” आणि मामांकडून आपल्या कामाचं कौतुक होणं म्हणजे मी केलेल्या कामाची पोचपावती मिळण्यासारखंच आहे.”

यासंदर्भात बोलताना मालिकेतील संयमी म्हणजेच शुभवी गुप्ते म्हणाली ,”डे १ पासूनच सीरियलमध्ये माझे माझ्या आजोबांबरोबर फार काही बरं नातं नाही आहे. मावशी माझ्यासाठी प्रिय आहे आणि मला तिच्यासोबत राहायचं असतं… आता आजोबांची सेकंड इनिंग सुरु झाली आहे आणि आम्ही तिघ त्त्यांच्याबरोबर राहतोय ह्याचा फारसा आनंद नाही झाला आहे संयमीला. ऑफस्क्रीन म्हणायचं झाल तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण मला माझा पहिला शो अशोक सराफ यांच्यासोबत करायला मिळाला. आम्हाला रोज नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत . Onscreen जेवढी काळजी ते घेतात आमची तेवढीच offscreen काळजी पण घेतात. खूप मज्जा येते मला त्यांच्याबरोबर काम करताना.”

पुढे ईशानचं पात्र करणारा स्वराज पवार म्हणाला, “आजोबांसोबत सुरूवातीपासूनच माझं नातं हे खोडकर,खट्याळ असल्यामुळे हे सारखे मला ओरडतातआणि तेवढंच त्यांचं माझ्यावर प्रेम सुद्धा आहे. आता जी आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे तिथे माझा आणि आजोबांचं नातं हळूहळू खुलत चाललं आहे. आजोबा मला आधी खूप कडक शिस्तीचे वाटत होते पण जेव्हा एका सीन दरम्यान मी त्यांच्यावर रुसलो होतो. त्या सीनमध्ये असे घडते की त्यांनी मला समजून सांगितले की माझी चूक काय आणि ते माझावर किती प्रेम करतात. तेव्हा मला कळले कि मालिकेत आजोबांचं माझ्यावर किती प्रेम आहे. ऑफस्क्रीन सीन करताना ते आम्हाला समजावून सांगतात की सीन कश्याप्रकारे करावे. अशोक मा.मा. ह्या मालिकेत अशोक सराफ ह्यांचा बरोबर काम करणं म्हणजे भाग्यच ते जसे onscreen आमचे लाड करतात त्यापेक्षा जास्त ते offscreen देखील आमचे लाड करतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading