Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

रॉयल्स् इलेव्हन, सुपरजायंट्स इलेव्हन संघांना विजेतेपद !!

पुणे :  ए-स्क्वेअर स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित दुसऱ्या ‘ए-स्क्वेअर प्रीमिअर लीग’ १२ आणि १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रॉयल्स् इलेव्हन आणि सुपरजायंट्स इलेव्हन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आपल्या गटाचे विजेतेपद मिळवले.
वडगांवशेरी येथील सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या १२ वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यामध्ये आदित्य दिघे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल्स् इलेव्हन संघाने चॅलेंजर्स इलेव्हनचा २ धावांनी निसटता पराभव करून विजेतेपद मिळवले. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या रॉयल्स् इलेव्हनने २५ षटकामध्ये १५७ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये रणवीर बालघरे याने ३२ धावांची खेळी केली. चॅलेंजर्सकडून गोलंदाजीमध्ये आदित्य चव्हाण आणि दक्श पवार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना चॅलेंजर्स इलेव्हनने २४.३ षटकामध्ये १५५ धावा करू शकला. हर्ष बेंडभर याने ३९ धावा आणि शौर्य तावरे याने ३७ धावांची खेळी केली. रॉयल्स्कडून आदित्य दिघे याने १९ धावांमध्ये ४ गडी बाद करून संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.
१४ वर्षाखालील गटामध्ये सोहम राऊत याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सुपरजायंट्स इलेव्हनने सुपरकिंग्ज इलेव्हनचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्‍या सुपरकिंग्जने १२७ धावांचे आव्हान उभे केले. हे लक्ष्य सुपरजायंट्स इलेव्हनने १८.४ षटकात पूर्ण केले. सोहम राऊत याने ५० धावा आणि शौर्य तावरे याने नाबाद २५ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण इन्सीया इंडस्ट्रीजचे संचालक श्री. इनामदार आणि सौ. इनामदार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू भाविका अहीरे आणि तिचे पालक तसेच ज्युडीशिअल क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दिपक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या टॅलेंट हंटचे स्काऊट अभिजीत सुद्रिक उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे संचालक ए-स्क्वेअर स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष अजय तायडे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सेंट अरनॉल्ड स्कूलचे फादर फ्रँक्लिन यांचे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले. सुत्रसंचालन पियुष ठक्कर यांनी केले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः १२ वर्षाखालील गटः 
रॉयल्स् इलेव्हनः २५ षटकात ९ गडी बाद १५७ धावा (रणवीर बालघरे ३२, कियान तेली १९, आदित्य चव्हाण २-१७, दक्श पवार २-२७) वि.वि. चॅलेंजर्स इलेव्हनः २४.३ षटकात १० गडी बाद १५५ धावा (हर्ष बेंडभर ३९, शौर्य तावरे ३७, आदित्य दिघे ४-१९, रणवीर बालघरे १-७); सामनावीरः आदित्य दिघे;
१४ वर्षाखालील गटः 
सुपरकिंग्ज इलेव्हनः २० षटकात ९ गडी बाद १२७ धावा (इझान इनामदार २२, आरव चतुर्वेदी २२, अर्जुन आखाडे ३-२८, सेजल जेडीया २-९, वल्लभ जोशी २-११) पराभूत वि. सुपरजायंट्स इलेव्हनः १८.४ षटकात २ गडी बाद १३१ धावा (सोहम राऊत ५० (४७, ९ चौकार), शौर्य तावरे नाबाद २५, हर्ष बेंडभर १६, आदित्य दिघे १-२३); सामनावीरः सोहम राऊत;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading