Monday, June 8, 2026
BusinessLatest News

वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीजने जिंदाल रिन्युएबलसह सर्वात मोठी 2 GW सोलर EPC ऑर्डर मिळवली

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी सोलर पीव्ही मॉड्यूल निर्माता कंपनी तसेच वारी एनर्जीज लि.ची उपकंपनी, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लि. (WRTL) ने, सनब्रीझ रिन्युएबल्स नाइन प्रा.लि.च्या 2 GW सौर प्रकल्पसाठी त्याचे आतापर्यंतचे सर्वात मोठे अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) कंत्राट जिंदाल रिन्युएबल्सचे स्पेशल पर्पज व्हेईकलसाठी (SPV) मिळवले आहे. ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि जास्तीत जास्त निर्मितीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांचा वापर करून हा प्रकल्प राजस्थानमधील बिकानेर येथे राबविण्यात येईल.

या सहयोगांतर्गत, सोलर पीव्ही प्रकल्पाची रचना, अभियांत्रिकी, खरेदी, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्यावर WRTL लक्ष ठेवेल तसेच नियुक्त केलेल्या पॉइंट ऑफ इंजेक्शन (POI) वर स्वच्छ ऊर्जेची कार्यक्षम वितरण सुनिश्चित करेल.

भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या अक्षय्य ऊर्जा कंपन्यांपैकी एक, जिंदाल रिन्युएबल्स देखील हरित ऊर्जेचा अवलंब करणे आणि शाश्वतता वाढवणे हे उद्दिष्ट ठेवते. ही भागीदारी भारताच्या स्वच्छ ऊर्जेतील संक्रमणाला पुढे नेण्याच्या दोन्ही कंपन्यांच्या सामायिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकते आणि मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये अग्रणी म्हणून WRTL ची प्रतिष्ठा आणखी मजबूत करते.

जिंदाल रिन्युएबल्सचे अध्यक्ष भरत सक्सेना म्हणाले, “पोलाद उद्योगात शाश्वतता आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी हा प्रकल्प पूर्णपणे जोडलेला आहे. कमी उत्सर्जनासोबतच पोलाद उत्पादनासाठी वारीसोबत भागीदारी करणे ही फक्त एक सुरुवात आहे. अक्षय्य ऊर्जा उपायांचा अवलंबण्याच्या मार्गावर आम्ही पुढे जात असल्याने असे आणखी बरेच उपक्रम असतील.”

वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संचालक वीरेन सी. दोशी म्हणाले: “या महत्त्वाच्या 2 GW सोलर EPC प्रकल्पासाठी जिंदाल रिन्युएबल्ससोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना पाठबळ देण्यासाठी अत्याधुनिक नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन्स वितरीत करण्याच्या आमच्या समर्पणाला ते बळकटच करते. जिंदाल रिन्युएबल्ससोबतची ही भागीदारी भारतामध्ये आणि जागतिक स्तरावर शाश्वत ऊर्जा परिवर्तन घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

2 GW सौरऊर्जा हरितगृह वायू उत्सर्जन कमी करताना तसेच भारताच्या अक्षय्य  ऊर्जा उद्दिष्टांमध्ये लक्षणीय योगदान देत, भरीव स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी सज्ज आहे. हा प्रकल्प पर्यावरणीय शाश्वतता साध्य करण्यासाठी आणि संपूर्ण देशात स्वच्छ ऊर्जा उपायांचा अवलंब करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading