‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा : गलॅक्टिक वॉरीयर्स एफसी संघाला व्दितीय श्रेणी गटाचे विजेतेपद !!
कात्रज येथील भारती विद्यापीठच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात गलॅक्टिक वॉरीयर्स एफसीने बीएफसी रेंजहिल्स मिलान एफसीचा २-१ असा पराभव केला. गलॅक्टिक वॉरीयर्सकडून प्रजीत कुमार आणि वॉल्श दरेल यांनी गोल नोंदविले. बीएफसी रेंजहिल्स मिलान एफसीकडून शिवन व्दिथाने याने गोल नोंदविला. दुसऱ्या सामन्यात सागर जगताप याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर बोपोडी एफएफए एफसीने स्ट्रायकर्स फुटबॉल क्लब पुणे संघाचा ३-२ असा पराभव केला. स्ट्रायकर्स फुटबॉल क्लबकडून आदित्य चव्हाण याने दोन गोल नोंदविले.
स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या ‘सुपर-८’ गटसाखळी फेरीमध्ये गलॅक्टिक वॉरीयर्स एफसीने सात सामन्यांमध्ये ६ विजय आणि एक पराभव अशा कामगिरीसह १८ गुणांसह पहिला क्रमांक मिळवत विजेतेपद मिळवले. बोपोडी एफएफए एफसी संघाने ५ विजय, १ बरोबरी आणि १ पराभव अशा कामगिरीसह १६ गुणांसह उपविजेतेपद पटवकाले. बीएफसी रेंजहिल्स मिलान एफसी संघाने ४ विजय, २ बरोबरी आणि १ पराभव अशा कामगिरीसह १४ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः सुपर-८ गटसाखळी फेरीः व्दितीय श्रेणी गटः
१) गलॅक्टिक वॉरीयर्स एफसीः २ (प्रजीत कुमार १४ मि., वॉल्श दरेल १७ मि.) वि.वि. बीएफसी रेंजहिल्स मिलान एफसीः १ (शिवन व्दिथाने ६ मि.);
२) बोपोडी एफएफए एफसीः ३ (सागर जगताप ३६, ३९, ६२ मि.) वि.वि. स्ट्रायकर्स फुटबॉल क्लब पुणेः २ (आदित्य चव्हाण ८, २१ मि.);
