Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

साऊ फाउंडेशन आयोजित “गाव तिथे साऊ” या उपक्रमास महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पुणे: साऊ फाउंडेशन आयोजित ‘गाव तिथे साऊ’ या उपक्रमा अंतर्गत प्रथम प्रशिक्षण शिबिर रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी “नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे या ठिकाणी पार पडले. यावेळी वाडिया कॉलेज च्या प्राचार्या मा. डॉ. वृषाली रणधीर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या मानवतावादी कार्यास आपल्या शुभेच्छा दिल्या. साऊ फाउंडेशन कडून मुख्य मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण विभाग पुणे चे सहाय्यक आयुक्त माननीय श्री. विशाल लोंढे सर यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

जवळपास दीडशे स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभरातून या प्रशिक्षण शिबिरास आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत असताना मा.श्री. विशाल लोंढे सर यांनी शासनाच्या योजना कशाप्रकारे खेड्‌यापाड्‌यातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते प्रत्येक समाजातील दुर्बल घटकांच्या वर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महिला, तृतीयपंथी बांधव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिक दुर्बल इ. घटकांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शासनाच्या बऱ्याच साऱ्या योजना या घटकांसाठी उपलब्ध आहेत. पण या योजनांची माहिती तळा गाळतील लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा घटक अजूनही शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे असे मत त्यांनी मांडले.

प्रत्येक स्वयंसेवकांनी आपल्या गावातील अशा घटकांची व त्यांच्यासाठीच्या योजनांची माहिती मिळवून या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

त्यासाठी आपल्या भागातील अधिकाऱ्यांची मदत घेऊन संविधानिक मार्गानी त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. अशाप्रकारे आपण काम केल्यास आपण आपल्या देशात महामानवांच्या स्वप्नातील भारत देश घडवू शकतो असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांशी मा. विशाल लोंढे सर यांनी वार्तालाप केला व त्यांच्या वैयक्तिक शंका निरसन करण्यावर भर दिला. यावेळी बहुतांश स्वयंसेवकांनी साऊ फाउंडेशन करत असणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच कायमस्वरूपी साऊ फाउंडेशन सोबत समाजोपयोगी काम करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या वेळी साऊ फाउंडेशनचे संचालक श्री. गुणवंत सावळजकर व “गाव तिथे साऊ” या उपक्रमाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती सायली धनाबाई मॅडम यांनी उपस्थित राहून आपले विचार व्यकत केले. यावेळी साऊ फाउंडेशनचे संदीप कांबळे सर उपस्थित होते व या कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी पार पाडले. कार्यक्रमावेळी

साऊ फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम नियोजनात मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती कावेरी नरवडे यांनी केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading